Raksha Bandhan 2024 esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024: भावा-बहिणीच्या नात्यात या मुद्द्यांवर उडू शकतात खटके, आधीच काळजी घेतली तर नात्यातील गोडवा टिकेल

Brother-Sister Relationship Tips : लहानपणापासून एकत्र राहिलेल्या भावा-बहिणींचं प्रेम टिकवणं हे तर आत्ताच्या जमान्यात आव्हान बनलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan :

पूर्वीच्या काळात तेही प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून फक्त भावकीसोबत वाद व्हायचे. काही वाद तर सख्ख्या भावांमध्ये झाले आहेत. प्रॉपर्टी-मानपान यावरूही घरा-घरात खटके उडतात. पण, आजकाल अनेकवेळा असे दिसून येते की, घरा-घरात भावा-बहिणींची भांडण होतात.

लहानपणापासून एकत्र राहिलेल्या भावा-बहिणींचं प्रेम टिकवणं हे तर आत्ताच्या जमान्यात आव्हान बनलं आहे. आपल्या बहिणीला त्रास देतो  म्हणून इतरांशी वाकडं घेणारा भाऊ लग्नानंतर बहिणीच्या विरोधात जातो. तर, इतरांपुढं भावाचं गुणगाण गाणारी बहिण भावाचाच राग-राग करायला लागते. असं का होतं याचा कधी विचार केलाय का ?

वहिणीचा आदर करा

बहिण लग्न करून जाते त्यानंतर भावाचाही संसार सुरू होतो. पण जेव्हा बहिण माहेरी येते. तेव्हा ती वहिणीबद्दल अपशब्द वापरते. अन् त्यामुळेच भावा-बहिणीत खटके उडतात. त्यामुळे बहिणींनो एक लक्षात घ्या, जसे तुम्ही तुमच्या सासरची लक्ष्मी आहाता. तसे वहिणीही तिच्या घरची लक्ष्मी आहे. तिला तुम्ही अपशब्द वापरणे चुकीचे आहे.

वहिणी काही चुकत असेल तर तुम्ही थेट तिला न बोलता भावाला सांगा. तसेच यांच्या माघारीही वहिणीबद्दल कुणाला वाईट शब्द बोलू नका. वहिणीचा आदर करा. तिच्याशी मैत्रिपूर्ण नाते निर्माण करा.

भावाला वेळ द्या

जसं तुमच्या लग्नानंतर तुम्ही माहेरी जास्त वेळ देऊ शकत नाही. तसेच, भाऊही तुमच्यासाठी जास्त वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे, तुम्ही त्याच्यावर चिडचिड करू नका, वहिणी आली म्हणून बदललास,असे शब्द ऐकवू नका.  त्याला समजून घ्या. या नव्या नात्यांना सांभाळत त्याला तुम्हालाही सांभाळायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ देणं हा त्याचा हक्क आहे.

बहिणीकडे दुर्लक्ष करू नका

आपल्या बहिणीने वहिणीला आदर द्यावा, असे भावाला वाटते. तसे, बहिणीचा आणि तिच्या सासरच्यांचा सन्मान व्हावा असं तिला वाटतं. त्यामुळे बहिणीचाही तुम्ही सन्मान करा. तिला रक्षाबंधन, भाऊबीजला चांगलं गिफ्ट नाही देता आली तरी या दिवशी तिची भेट घ्या. तुमच्या आनंदी-वाईट क्षणी तिला विसरू नका.   

नात्यातील बंधनेही लक्षात घ्या

लहानपणी मस्ती-मजा करणारी भावंड लग्नानंतर बदलतात. त्यांच्या स्वभावातही गंभीरपणा येतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये झालेला हा बदलही स्विकारा. भावाने-बहिणीने हक्काने सगळं सांगावं, शेअर करावं असं वाटणं साहजीक आहे. पण, तशी अपेक्षा करू नका. कारण, नात्यातील बंधन समजून घ्या. 

एकमेकांवरील प्रेम दाखवा

काही भावंडांमध्ये प्रेम भरपूर असते. तर काहींच्या नात्यात दुरावा आलेला असतो. पण, भाऊ-बहिणीचं प्रेम हे सतत दाखवायला हवं. बहिणीला सरप्राईज गिफ्ट्स द्या, बहिणीला रक्षाबंधन,भाऊबीजला घरी बोलवा, तिच्या घरी जा. तिला बर्थडे विष करा. तसेच, एखादी मदत तिला लागणार असेल तर जमेल तसे मदत करा. आणि तिच्याकडेही बिंधास्त मदत मागा. यामुळे, तुमच्या नात्यातील प्रेम वाढेल आणि ते चिरंतन टिकेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT