Raksha Bandhan 2024 esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024 : वेड्या बहिणीची वेडी ही माया; रक्षाबंधनाची करा सुंदर सुरूवात, बहिण-भावाला द्या या हटके शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes In Marathi : भावाला अन् बहिणीच्या मनाला साद घालतील अशा खास शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan 2024 :

भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, वेड्या बहिणीची वेडी ही माया, मेरा भाई तू मेरी जान है. या आणि अशा गाण्यांमधून भावा-बहिणीचे प्रेमच जाहीर केलेले आहे. आज रक्षाबंधन आहे त्यामुळे सकाळपासूनच सर्वांच्या स्टेटस,स्टोरीवर ही गाणी झळकत असतील.

श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण, भावाला राखी बांधल्यानंतर त्यांना मनासारखी ओवाळणी मिळते. त्यामुळे बहिणी या सणाला नटुन-थटून असतात. (Rakshabandhan 2024 Wishes In Marathi )

भावासाठी –बहिणीसाठी शुभेच्छा दिल्या जातात. सकाळपासूनच बहिणीला काय शुभेच्छा द्यायच्या याच्या विचारात तुम्हीही असाल तर काळजी करू नका. आम्ही त्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. तुम्हाला प्रियजनांना देता येतील अशा खास शुभेच्छा पाहुयात.

नाते गुंफले हे रेशमी धाग्याने

वात्सल्य,आपुलकी अन् जिव्हाळ्याने

सदैव टिकावे हे बंध नात्याचे

बहिण-भावाच्या निर्मळ प्रेमाचे

 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

राखी बांधून हातात बहिण ओवाळे भावाला

भरून साखर तोंडात जीव लावे भावाला

बहिण-भावाच्या प्रेमाचा झरा असाच वाहत राहो

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

मेघाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे

हीच आहे बहिणीची इच्छा

लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

राखी म्हणजे गोड प्रेमाचा आणि गोड आठवणींचा सण

आनंदाचा अन् उत्साहाचा क्षण

भावाचा चेहरा माझ्या राहो हसमुख

देवा भावाच्या पायी लोळुदे सर्व सुख

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

तूच माझा आधार, तूच माझं सर्वस्व

देवाचे मानतो आभार, दिली ताई माझी भाग्याची

तिच खरी लक्ष्मी आहे माझ्या अंगणाची

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल ती ओढ आहे

म्हणून भाऊ-बहिणीच नात खूप गोड आहे

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

Mumbai Weather Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, कसं असेल तापमान? हवामान विभागाने दिली माहिती

म्हाडा ३० हजार घरे उभारणार, राज्य सरकारकडे १०० एकर जागेसाठी पाठपुरावा सुरू

SCROLL FOR NEXT