Rang Panchami 2024 esakal
लाइफस्टाइल

Rang Panchami 2024 : होळकर घराण्याने सुरू केलेला इंदोरचा प्रसिद्ध घेर उत्सव; 5 लाखांहून अधिक लोक होतात सहभागी

सुमारे 100 ते 200 फूट उंचीवरून हजारो किलो रंग आणि पाण्याची उधळण केली जाते

सकाळ डिजिटल टीम

 Rang Panchami 2024 :

द्वापरयुगात गोकुळात बाळ कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असायचे. त्यामुळे मुलांना होणारी उन्हाचा त्रास कमी व्हायचा. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. होळीनंतर येणारा पाचवा दिवस म्हणजे रंगपंचमी होय.

मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणा-या गीतांना फाग असे म्हणतात. राधा- कृष्ण, राम-सीता, शंकर-पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली फाग गीते प्रसिद्ध आहेत. तर महाराष्ट्रात याला रंगपंचमी म्हणून ओळखातात. (Rang Panchami 2024)

आज आपण मध्य प्रदेशातील रंगपंचमीची आगळी-वेगळी प्रथा पाहणार आहोत. मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील रंगपंचमी जगप्रसिद्ध आहे. येथील लोक खऱ्या अर्थाने रंगपंचमीच्या दिवशीच होळी खेळतात. या दिवशी इंदूरमध्ये मिरवणूक काढली जाते ज्याला घेर म्हणतात. या मिरवणुकीत शेकडो लोक सहभागी होऊन आकाशात गुलाल उधळला जातो.

आज रंगपंचमीचा सण आहे. इंदूरच्या घेरचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी घेरला आणखी खास बनवले जात आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

इंदूरमध्ये होळकर घराण्याच्या काळापासून घेरची परंपरा चालत आल्याचे सांगितले जाते. या दिवशी होळकर घराण्यातील राजे लोक सर्वसामान्यांसोबत होळी खेळण्यासाठी बाहेर पडत आणि संपूर्ण शहरात फिरत. उच्च-नीच भावना नष्ट करून हा सण एकत्रितपणे साजरा करणे आणि आपसात बंधुभाव वाढवणे हा त्याचा उद्देश होता.

रंगपंचमीच्या दिवशी राजघराण्यातील लोक बैलगाडीतून फुलांपासून तयार केलेले रंग आणि गुलाल घेऊन रस्त्यावरून जात असत. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकावर ते रंग उडवायचे, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारायचे. घराणेशाही संपल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली.  आज या शहरात नेते, समित्या, विविध संस्था एकत्र येऊन रंगपंचमी खेळतात.

या दिवशी पिचकारी, पाण्याचे टँकर आणि पाण्याच्या मिसाईल्सचा वापर करून सुमारे 100 ते 200 फूट उंचीवरून हजारो किलो रंग आणि पाण्याची उधळण केली जाते. घेर मिरवणूकीचा मुख्य मार्ग गौरकुंड चौक ते राजवाडा हा आहे.

याशिवाय शहराच्या विविध भागांतून तो काढला जातो, पण तोही राजवाड्यातच संपतो. हे दृश्य पाहण्यासाठी लांबून पर्यटक येथे येतात. रंगपंचमी साजरी केल्यानंतर लोक पुरी-श्रीखंडचाही आस्वाद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT