Emotional Intimacy esakal
लाइफस्टाइल

जोडीदारासोबत भावनिक जवळीक साधण्याचे आहेत 'हे' सहा मार्ग

दोघांमध्ये सुदृढ भावनिक जवळीक नसेल तर नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

जोडीदारासोबत नाते (Relationship) निर्माण करायचे असेल तर जवळीक निर्माण होणे फार महत्वाचे असते. त्यात भावनिक जवळीक(Emotional Intimacy) साधली जाणे महत्वाचे ठरते. जर दोघांमध्ये सुदृढ भावनिक जवळीक नसेल तर नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या गरजा समजून घेण्यासाठी भावनिक जवळीक साधणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी जोडप्यांनी नेहमीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, वैयक्तिक कल्याणासाठी असे नातेसंबंध असल्यास फायदा होतो. तुम्हाला जर असे बंध आणखी मजबूत करायचे असतील तर या टिप्स फायद्याच्या ठरतील.

Emotional Intimacy

१) जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत वैयक्तित वेळ घालवत असाल तेव्हा तो क्षण फक्त तुम्हा दोघांचाच असेल, याची काळजी घ्या. अशावेळी तुम्ही फोन बघत राहिल्यास समोरची व्यक्ती साहजिकच चिडेल. तुम्ही फोन बाजूला ठेवून पूर्ण वेळ जोडीदाराला देऊन त्याच्याशी संवाद साधा.

२) काही गोष्टींबाबात जोडीदाराचा दृष्टीकोन कसा आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो असा विचार का करतोय? स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कारण जाणून घेणे चांगले. यामुळे तुम्हाला त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. तुम्हाला त्याचा दृष्टिकोन समजून घ्यावासा वाटतोय, या कारणाने त्यालाही आनंद होईल.

Emotional Intimacy

३) तुम्ही सहसा करत नसलेल्या गोष्टी करून जोडीदाराला आश्चर्याचा धक्का द्या. तुम्ही त्यांना खरोखर आवडेल असे काहीतरी बनवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही त्याचे आवडते जेवण बनवू शकता किंवा तुम्हाला आवडत नसला तरीही त्याचा आवडता कार्यक्रम पाहू शकता. असे केल्यानेही तुमची भावनिक जवळीक खूप वाढू शकते.

४) जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींची यादी बनवा. माणसातील दोष दाखवणे खूप सोपे आहे. पण आता तुम्ही जोडीदाराला छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्या लिहून घ्या. यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमच्या जोडीदारालाही यामुळे आनंद मिळेल.

Emotional Intimacy

५) तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही आनंदी आणि निरोगी असता, तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तीव्रतेने कनेक्ट होऊ शकता. म्हणून, आपले आरोग्य आणि कल्याण जाणून घ्या. त्यासाठी स्वतःसोबत आणि जोडीदारासोबत वेळ घालवा.

६) महत्वाचे म्हणजे, आक्रमकता टाळा. तुम्हाला एखादा मुद्दा समजून सांगायचा असेल तर, शांतपणे सांगा.चिडचिड करू नका. यामुळे नात्यात बांधा येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT