लाइफस्टाइल

मासिक पाळीच्या काळात तरुणीच्या डोळ्यातून येतं रक्त

सकाळवृत्तसेवा

अनेकदा एखादा गंभीर आजार झाला की उलटी किंवा विष्ठेच्या मार्गाने रक्त पडतं हे साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, कधी डोळ्यातून रक्त येतं हे ऐकलं आहे का? वाचून धक्का बसला असेल ना. पण हो. चंदिगढमधील एका २५ वर्षीय तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानकपणे या तरुणीच्या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्ताच्या धारा वाहु लागल्या. या घटनेनंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे रक्त येताना तिला कोणताही प्रकारचा त्रास किंवा वेदना होत नसून दर महिन्यातून एकदा तरी तिच्यासोबत हा प्रकार घडत असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे ज्यावेळी तिला मासिक पाळी येते त्यावेळी तिच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

चंदीगढ येथे राहत असलेल्या एका मुलीच्या डोळ्यातून महिन्यातून एकदा रक्त येत असल्याचं समोर आलं आहे. या समस्येमागील कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या, तिच्या कुटुंबाची वैद्यकीय पार्श्वभूमी तपासून पाहिली. परंतु. तिच्या कुटुंबात ही समस्या कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही. त्यामुळे डॉक्टरांनी या प्रकरणाचा अभ्यास केला आणि या मुलीला ocular vicarious menstruation ची समस्या असल्याचं समोर आलं.

ocular vicarious menstruation  म्हणजे काय?

ocular vicarious menstruation  हा अत्यंत दुर्मिळ समस्या असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये मासिक पाळीच्या काळात अनेक स्त्रियांच्या बाह्य अवयवांमधून रक्तस्त्राव होतो.  अनेकदा हा रक्तस्त्राव नाक, डोळे, फुफ्फुस किंवा पोटातून देखील होऊ शकतो. मासिका पाळीच्या काळात हर्मोन्समध्ये अनेक बदल घडत असतात. त्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचं म्हटलं जातं.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT