Reishi Mushroom Sakal
लाइफस्टाइल

Reishi Mushroom: कित्येक समस्यांवर गुणकारी आहे रेशी मशरूम; तणाव अन् निद्रानाशाची समस्या राहील दूर

Reishi Mushroom: या मशरूमचे सेवन केल्याने कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्याचा धोका कमी करू शकतात.

Puja Bonkile

मशरूम खाणे आरोग्यदायी असते. तसेच मशरूमचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक रेशी मशरूम चीनमध्ये पारंपारिकपणे औषधी फायद्यांसाठी वापरले जाते. हे मशरूम पॉलीपोर या जातीतील असून याचे सेवन करणे आरोग्यदायी असते. तुमच्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते हृदयाविकारापर्यंत अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते.

तणाव कमी

पॉलिसेकेराइड्स आणि बीटा-ग्लुकन्स तुमचे शरीर विविध रोग आणि संक्रमणांशी लढण्यासाठी तयार करतात. हे मशरूम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. काही तणाव निवारक संयुगे तुमची मज्जासंस्था संतुलित करतात. हे तुमचे मन आणि शरीर शांत करू शकते आणि तुम्हाला आराम मिळतो.

निरोगी यकृत आणि कर्करोग दूर राहतो

या मशरूमचे सेवन केल्याने कर्करोगाच्या उपचारांचे दुष्परिणाम आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्याचा धोका कमी करू शकतात. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे वरदान आहे. हे मशरूम यकृताच्या पेशी पुन्हा निर्माण करू शकते आणि शरीरातील जळजळ कमी करू शकते. या निरोगी बमशरूमचे सेवन हेपेटायटीस आणि फॅटी लिव्हर सारख्या रोगांना दूर ठेवते.

हृदयाचे निरोगी आरोग्य आणि रक्तातील साखर

आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक लोक उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडतात. रेशी मशरूम शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन नियंत्रित करू शकते.

त्वचेसाठी फायदेशीर

रेशी मशरूम त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर चमक येते. त्यात पॉलिसेकेराइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि ट्रायटरपीन्स सारखे घटक असतात.

योग्य झोप

अपुरी झोप शरीराच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम करू शकते. यामुळे झोपेचे वेळापत्रक ठरवावे. संशोधकांनी सिद्ध केले आहे की रेशी मशरूम खाल्ल्याने मनं आणि शरीराला शांत करून झोप येण्यास मदत करते.

रेशी मशरूम हे सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु इतर औषधी उत्पादनांप्रमाणे ते काही लोकांसाठी हानीकारक ठरू शकते. म्हणून, आपल्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT