fight with your partner
fight with your partner esakal
लाइफस्टाइल

क्यों पैसा पैसा करती हैं? पैशांमुळे पार्टनरसोबत वाद होतोय का?

सकाळ डिजिटल टीम

Relationship Issues: जेव्हा लोक रिलेशलशीपमध्ये येतात तेव्हा प्रेमासोबत कधी-कधी वाद, छोटे-मोठी भांडणे होणे सामान्य गोष्ट आहे. एकत्र राहताना पती-पत्नी किंवा प्रेमी जोडप्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर रुसून बसतात. प्रेमामध्ये रुसणे-मनवणे यामुळे नात्यामधील प्रेम वाढते. पण कधी कधी छोटे छोटे वाद मोठ्या भांडणाचे कारण ठरते. जर या भांडणाचे कारण जाणून घेऊन वेळीच उपाय केले तर ब्रेकअपची वेळ येणारच नाही. त्यामुळे तुम्हाला माहित असले पाहिजे की पार्टनर सोबत होणार्‍या वादाचे नेमकं कारण काय? येथे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की कपल्समध्ये होणार्‍या वादाचे कारण कधीही पैसे ठरू नये. रुपये - पैशांमुळे होणार्‍या वादामुळे नात्यामध्ये दुरावा येतो. चला जाणून घेऊ की आर्थिक व्यवहारांमुळे कपल्समध्ये वाद का होतात?

गुपचूप आपल्या कुटुंबातील लोकांवर पैसे खर्च करणे

पती आणि पत्नी एकत्र मिळून कमवत असो किंवा कोणी एक कमवत असो, जर कोणीही एक पार्टनर दुसर्‍या पार्टनरला सांगितल्याशिवाय आपल्या कुटुंबावर पैसे खर्च करत असेल, त्यांना गिफ्ट देत असेल किंवा कुटुंबाच्या मदतीसाठी पैसे लपवून देत असतील तर तेच चुकीचे आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबाची मदत करायची असेल किंवा बाहेरील व्यक्तीवर पैसे खर्च करणार असाल तर आपल्या पार्टनर पासून लपवू नका.

अनावश्यक खर्च ठरू शकतो वादाचे कारण

जर दोघंही कमावत असतील किंवा कोणी एकच जण कमावते असेल तर आर्थिक व्यवहारांवरून वाद होऊ शकतात. पती आणि पत्नीमध्ये जर कोणी एक जर जास्त खर्च करत असेल किंवा एका कुटुंबाच्या जबाबदारीसाठी, बचत करण्यासाठी आपला पूर्ण पगार वापरत असेल आणि दुसरा वैयक्तिक खर्चांवर पैसे खर्च करत असेल तर वाद होऊ शकतो. दोघांनी मिळून पैसे जमवून पैसे जमा केले पाहिजे. वैयक्तिक खर्च करण्यासाठी आधी जोडीदाराचा विचार करा.

पार्टनरवर जबाबदार्‍यांचे ओझं

महागाईच्या काळामध्ये घर खर्च आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पती किंवा पत्नी दोघांनाही कमवावे लागते. पण आर्थिक जबाबदारीचे ओझे कोणत्याही एकावर आल्यास त्याचा स्वभाव चिड-चिडा होतो. अशामुळे जेव्हा तुम्ही त्यांना खर्च किंवा इतर कामांसाठी पैसे मागता तेव्हा ते नाराज होतात किंवा वाद होतात. त्यामुळे पार्टनरची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकी मदत करा.

उधार घेणे

पती-पत्नी पैशांचे देणे-घेणे किंवा उधारीवरून वाद होऊ शकतात. पती किंवा पत्नी कोणालाही उधार देण्याची-घेण्याची सवय असेल तर दुसर्‍या पार्टनरला कुटुंब किंवा समाजासमोर मान खाली घालावी लागू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉ तावरेंना 14 कॉल, पुणे पोर्शे अपघातात पोलिसांकडून नवा खुलासा!

Pakistan: जगाचे डोळे उघडणारे सत्य आलं समोर! वाजपेयींचे नाव घेत नवाज शरीफांनी दिली मोठी कबुली

Kolhapur : महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; जयसिंगपुरात गर्भलिंग निदान, गर्भपाताचे रॅकेट? शहरात उडाली खळबळ

Nursing Entrance Exam : नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी शिक्षक वेठीस; १५ तासांपूर्वी उपस्थित राहण्यासाठी पत्र

Pune Porsche Car Accident: पोर्श अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांंची धाड

SCROLL FOR NEXT