Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : आजकाल इतके घटस्फोट का होत आहेत? मोटीव्हेशनल स्पीकर शिवानी यांनी सांगितले की...

'लोक असे म्हणतात की, नातं दोघांच असलं तरी नेहमी मीच सगळं करतो'

सकाळ डिजिटल टीम

Relationship Tips :

आजकालच्या जमान्यात लग्न जमण्यापेक्षा मोडण्याची संख्या जास्त वाढली आहे. कारण शुल्लक असतं पण लग्नासारख्या सोहळ्यात हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत केलेलं लग्न क्षणात मोडतं. सध्या क्रिकेटपटू हार्दीक पांड्याचा घटस्फोट होईल अशी चर्चा आहे. तर , बॉलिवूडमधीलही अनेक कलाकारांनी वेगळे होणे पसंत केले आहे.

सध्या घटस्फोट होण्याचे प्रमाण का वाढले आहे. याबद्दल मोटिव्हेशनल स्पिकर शिवानी यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

मोटिव्हेशनल स्पीकर सिस्टर शिवानी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की लोक घटस्फोट का घेतात. घटस्फोटामागील कारण म्हणजे त्यांची एक छोटीशी चूक जी नंतर मोठी होऊन घटस्फोटाचे मुख्य कारण बनते.

शिवानी म्हणतात की, दहा वर्षांपूर्वी जेव्हा लोक घटस्फोट घ्यायचे तेव्हा त्यांच्याकडे कारण असायचे. काही भांडण, फसवणूक होत असेल तर ते घटस्फोटाचा विचार करायचे. पण, सध्याच्या लोकांना घटस्फोट का घेत आहात असं विचारलं तर त्यांच्याकडे उत्तर नसतं.

असे लोक सांगतात की, मला या नात्यात रहायची इच्छा नाहीय, कारण मला या नात्यात काहीच मिळालं नाही,म्हणून मी घटस्फोटाचा विचार केला. पण, खरंच तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी या नात्यात गेला होता तर मग आता घटस्फोट का घेत आहात. आणि लोकांना हेच कळत नाही की, त्यांना नातं तोडायचंच होतं तर ते या नात्यात गुंतलेच का?

नेहमी देणारे बना

लोक असे म्हणतात की, नेहमी मीच सगळं करतो, मीच जोडीदाराला भेटवस्तू देतो, मीच त्याच्यासाठी नेहमी धावपळ करते, तो काहीच करत नाही. अशा लोकांना शिवानी सांगतात की, तुम्ही एक लक्षात घ्या की, घेणाऱ्यापेक्षा देणारा मोठा असतो. त्यामुळे, नेहमी देणारे बना. आणि जे काही हवं आहे ते देवाकडे मागा.

तुमच्याहून मोठा देणारा तो आहे देव. त्यामुळेच देवाकडे मागा आणि जोडीदाराला सांभाळा. कारण, लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले जातात. पण, नंतर परिस्थिती समजू लागते. तेव्हा घटस्फोट डोकं वर काढतो. त्यामुळे अपेक्षा न ठेवता प्रेम करा आणि नातं सांभाळा, असा सल्लाही शिवानी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : संजय राऊत यांचा 'वंदे मातरम्' वरुन सरकारवर निशाणा

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT