Relationship Sakal
लाइफस्टाइल

Relationship: नात्यातील हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी 'या' गोष्टी आवर्जून करा

नात्यांमध्ये पुढील गोष्टी असल्यास एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढते.

पुजा बोनकिले

relationship tips how increase love care in couples

नात्यात प्रेम आणि आपुलकी असल्यास ते दीर्घकाळ टिकून राहते. कधीकधी छोट्या गोष्टींमुळे देखील नात्यात वाद निर्माण होतात. वाद एवढे वाढतात की नात्यात कटूता येऊन तुटू शकते. यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढते हे जाणून घेऊया.

  • मनमोकळे बोलावे

तुम्हाला नात्यातील प्रेम वाढवायचे असेल तर एकमेकांशी मनमोकळे बोलावे. यामुळे एकमेकांबद्दल असलेले गैरसमज दूर होतात.

  • गोष्टी शेअर करा

नात्यातील हरवलेले प्रेम पुन्हा मिळवायचे असेल तर एकमेकांसोबत गोष्टी शेअर करायला शिका. तुम्ही जर दोघेही नोकरी करत असाल तर घरी आल्यावर एकमेकांसोबत दिवसभरात घडलेल्या गोष्टी शेअर करा. यामुळे एकमेकांना कोणत्या समस्या असतील तर समजेल आणि त्यावर उपाय शोधत येईल. असे केल्याने दोघांमधील प्रेम वाढू शकते.

  • प्रोत्साहन द्या

जोडीदाराला चांगल्या कामासाठी किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यामुळे नात्यातील प्रेम आणि आपुलकी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

  • क्षमा करा

नात्यातील प्रेम आणि आपुलकी वाढवण्यासाठी एकमेकांना क्षमा करायला शिकावे. जर जोडीदार झालेल्या चुक मान्य करत असेल तर त्याला क्षमा करावे. यामुळे तुमच्याबद्दल जोडीदाराच्या मनात आदर देखील वाढेल.

  • सरप्राइज द्या

जोडीदाराला सरप्राइज गिफ्ट किंवा डिनर प्लॅन करू शकता. यामुळे जोडीदारासाठी तुम्ही खुप खास आहात असे वाटेल. यामुळे नात्यातील प्रेम वाढण्यास मदत मिळते.

  • एकत्रवेळ घालवा

नात्यात प्रेम आणि आपुलकी वाढवण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. यासाठी एकत्र फिरायला जावे किंवा एकत्र स्वयंपाक बनवावा किंवा बाहेर फिरायला जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT