Relationship Tips Sakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : पार्टनरचा विश्वास जिंकायचाय? जाणून घ्या सोप्या टिप्स, लोक तुम्हाला म्हणतील ‘परफेक्ट कपल’

कोणतेही नाते दीर्घकाळासाठी टिकवायचे तर यामध्ये विश्वास ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. नात्यात विश्वास असणे का महत्त्वाचे असते, जाणून घेऊया सविस्तर…

Harshada Shirsekar

Relationship Tips In Marathi आनंदी, हेल्दी आणि रोमँटिक जीवन जगण्यासाठी कोणत्याही नात्यात विश्वास असणे आवश्यक आहे. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. ‘विश्वास’ हा दोन व्यक्तींना एकमेकांचे समर्थन देण्यासाठीचे, हेल्दी रिलेशनशिप आणि नात्यात सकारात्मकता टिकवून ठेवण्याचे कार्य करतो.

तुमचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकण्याची शक्यता फार कमी असते. महत्त्वाचे म्हणजे नात्यामध्ये विश्वासाचा अभाव असेल तर नात्याचे संपूर्ण गणितच बिघडते. पण तेच जर नात्यात विश्वास असेल तर मग तुम्हा दोघांचंही आयुष्यही सूख-आनंदाने व्यापून जाते.  

चांगले श्रोता व्हा

तुमचे नातेसंबंध नवीन असेल आणि तुम्हाला एकमेकांचा विश्वास जिंकायचा असेल तर सर्वप्रथम आपण चांगले श्रोता होण्याचा प्रयत्न करा आणि जोडीदार काय म्हणतोय त्यास योग्य पद्धतीने प्रतिसाद द्या. जेव्हा तिचे/त्याचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न कराला तेव्हा तुमच्या नात्यातील विश्वास आपोआप वाढेल. 

खोटं बोलणं टाळा

जोडीदाराला खूश करण्यासाठी खोट्याचा आधार घेणे टाळा. तुम्हाला काही सांगायचेच असेल तर खरे सांगा, खोटे बोलून तुम्ही तुमच्या हाताने नाते उद्ध्वस्त करत आहात, हे लक्षात घ्या. खरेच बोललात तर तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वासच करेल, शंका घेणार नाही. 

दिलेला शब्द पाळा

कित्येक लोक जोडीदाराला खूश करण्यासाठी काही वचने देतात आणि त्यानंतर विसरतात. पण अशी चूक करणे टाळा आणि दिलेले शब्द पाळा. तुम्ही या चुका वारंवार केल्यास जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल अविश्वास आणि शंकाच निर्माण होईल.

संवाद साधा

तुम्ही घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे दोघांच्याही जीवनावर वाईट परिणाम होत असतील किंवा होणार असतील तर कोणतेही निर्णय स्वतंत्र पद्धतीने घेण्याऐवजी जोडीदारासोबत बसून त्याबाबत चर्चा करा. यामुळे नाते अधिक बहरत जाईल. दोघांच्या आयुष्याचा निर्णय आपण एकट्यानेच घेतल्यास नात्यातील विश्वास कमी होऊ शकतो.

कमीपणा न बाळगता सॉरी म्हणा

तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याबद्दल स्वतःहून माफी मागितल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल. कारण बऱ्याचदा कोणीही सॉरी म्हणायला तयार नसते. पण एका सॉरीमुळे तुमच्या नात्याचा पाया भक्कम होऊ शकतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT