लाइफस्टाइल

कोणत्या बोटाने कपाळावर टिका लावणे शुभ असते?, जाणून घ्या काही खास गोष्टी

या नामाप्रमाणे चंदन, कुंकू, भस्म हे ही कपाळावर लावले जातात.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी कपाळावरील टिळकला विशेष महत्त्व आहे. कपळावर लावला जाणार हा टिळक किंवा नाम हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. माथ्यावर टिळक लावणे हे शुभ मानले जाते. या नामाप्रमाणे चंदन, कुंकू, भस्म हे ही कपाळावर लावले जातात. या सगळ्यांचे महत्वही वेगळे आहे. डोक्यावर वेगवेगळ्या बोटांनी टिळक लावण्याचा परिणाम आणि महत्त्वही वेगवेगळे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या बोटाने कपाळावर टिळक लावणे सर्वात शुभ मानले जाते.

प्रत्येक बोटाने टिळक लावण्याचे महत्त्व

हिंदू धर्मानुसार जर कोणी शुभ कार्यासाठी बाहेर पडले तर त्याला मधल्या बोटाने टिळक, टिका किंवा नामा ओढावा. हे शुभ मानले जाते. त्यामुळे त्याचे काम चांगले होते. मधले बोट शनि ग्रहाशी संबंधित आहे आणि शनि ग्रह यशाचे प्रतीक आहे. त्यामुळे मधल्या बोटाने टिका लावल्यास काम निर्विघ्नपणे पार पडते असे मानले जाते.

अनामिका या बोटाने कपाळावर टिका लावल्याने मनाला शांती मिळते. सूर्यदेव अनामिकामध्ये वास करतात. अनामिका देवाच्या चित्रावरही टिका लावला जातो. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते. शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. घरात सुख-समृद्धी नांदते. मृत्यूनंतर, व्यक्तीच्या कपाळावर सर्वात लहान बोटाने म्हणजेच करंगळीने टिका लावला जातो. जे त्याच्या मोक्षप्राप्तीचे प्रतीक मानले जाते.

या गोष्टी लक्षात ठेवा

शास्त्रात टिळक लावण्याचे काही नियम आहेत. त्या नियमांनुसार टिळक लावणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार स्नान केल्यानंतरच कपाळाला टिका लावावा. तसेच टिका लावताना तोंड उत्तरेकडे असावे आणि स्वच्छ हाताने कपाळावर टिळक लावावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Latest Marathi News Live Update : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; मुलाखतीसाठी २,५२६ उमेदवार पात्र

SCROLL FOR NEXT