𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐙𝐢𝐧𝐣𝐮𝐫𝐤𝐞  sakal
लाइफस्टाइल

इंस्टाग्राममुळे हा तरूण झाला कोट्यधीश! महिन्याला कमावतोय 5-25 लाख रूपये, मर्सिडीजही केली खरेदी

सोशल मीडिया आज कमाई करण्याचे एक असे साधन बनले आहे, ज्यामुळे अनेकांचे नशीबच बदलले आहे. असाच एक तरुणही इंस्टाग्राममुळे कोट्यधीश बनला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दोन प्रकारचे लोक प्रसिद्ध होतात, एक म्हणजे जे आधीच स्टार आहेत आणि दुसरे ते ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आपले नाव कमावले आहे. जी मंडळी कष्ट करतात त्यांना प्रगतीचा मार्ग नक्कीच सापडतो. तुम्ही ठरवलं तर यु-ट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावू शकता. 

पण कष्टाला पर्याय नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करायची असेल तर मेहनत तरी घ्यावी लागणारच. देशभरात असे हजारो तरूण आहेत, जे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्याने शून्यातून विश्व साकारलंय. 

या तरुणाचं नाव आहे रोहित झिंजुर्के (Rohit Zinjurke). रोहित झिंजुर्के हा सोशल मीडियावरील प्रसिद्ध Influencer आहे. त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत आहे. रोहितचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. दरम्यान रोहितने इथंवर पोहोचण्यासाठी केलेली मेहनत अतिशय प्रेरणादायी आहे. 

बालपण गेले गरिबीतच 

अभिनेता व सोशल मीडिया Influencer रोहितची कहाणी मनाली भिडणारी अशीच आहे. रोहितचा जन्म 09 एप्रिल 2001 रोजी गुजरातमधील सुरत येथे एका गरीब कुटुंबात झाला. रोहितच्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्यांनी कुटुंबाकडे कधीच लक्ष दिले नाही.

त्यांच्या रोजच्या कटकटीला कंटाळून अखेर रोहितच्या आईनं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्या एकट्याच रोहित व त्यांच्या बहिणीचा सांभाळ करू लागल्या. रोहितच्या वडिलांनी त्याच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्नही केला होता.  

करिअरला अशी झाली सुरुवात  

रोहितने इयत्ता बारावीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले व यानंतर त्यानं साडीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. यादरम्यान एका मित्राने रोहितला टिकटॉकबद्दल सांगितले आणि टिकटॉकमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. रोहितने कसेतरी फोनचा जुगाड करत आपल्या टिकटॉक अ‍ॅपवरील करिअरला सुरुवात केली.

जेव्हा रोहितचे टिकटॉक अ‍ॅपवर एक दशलक्ष इतक्या संख्येनं फॉलोअर्स झाले होते, तेव्हा नीता शिळीमकरने त्याला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता. हा मेसेज पाहिल्यानंतर रोहितला धक्का बसला होता कारण नीता ही एक लोकप्रिय क्रिएटर होती. नीताने रोहितला मुंबईला बोलावले आणि दोघांनी एकत्र व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT