Safe Diwali Tips esakal
लाइफस्टाइल

Safe Diwali Tips : हातात फटाका फुटला तर लगेचच करा हे प्राथमिक उपचार, जखम लवकर भरून येईल

हाताला भाजले तर त्या ठिकाणी तुळशीचा रस लावता येतो

Pooja Karande-Kadam

Safe Diwali Tips :

लहान मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की दिवाळीत काय काय करायचं याचं प्लॅनिंग तयार असतं. दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी फटाके फोडण्याची अनुमती होय. किल्ला बनवताना चिखलात खेळल्यावरही घरचे ओरडत नाहीत. त्यामूळे दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.

दिवाळीत फटाके फोडताना विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा फटाके हातात फुटले, आपल्या जवळच फुटल्याने हातापायाला भाजणे, कपडे पेट घेणे, असे अपघात होतात. मुलांच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा घडतात.

मुलांना भाजलेली जखम पाहून पालकांना काही सुचेनासे होते. त्यामुळे सगळे सांगतील ते उपाय मुलांवर केले जातात. पण हे साफ चुकीचे आहे. मुलांच्या हातात फटाका फुटला,किंवा त्यांना जखम झाली तर नक्की काय प्राथमिक उपाय करावे याबद्दल आपण जाणून घेऊयात.

कोलगेट लावा

भाजलेल्या हातावर कोलगेटचा वापर केला तर जळजळ थांबते. भाजल्यामुळे हात भगभगत असतो, अशावेळी थंडगार कोलगेट तूम्हाला आराम देईल.  

कोरफडीचा गर

कोरफडीचा गुणधर्म हा थंड असतो. भाजलेल्या जखमेचा होणारा दाह कमी करण्यासाठी कोरफडीचा गर लावू शकता. त्यामुळे आग थांबते. त्यांनंतर तुमच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा. 

थंड पाण्याचा वापर करा

कोणत्याही ज्वलनशील पदार्थाने किंवा फटाक्याने हात व पाय जळाल्यास त्यावर ताबडतोब थंड पाणी टाकावे किंवा हात व पाय थंड पाण्यात बुडवावेत. असे केल्याने जखमेच्या भागाला आराम मिळतो.

 

तुळशीचा रस

फटाक्यांमुळे हात भाजले तर त्या ठिकाणी तुळशीचा रस लावता येतो. असे केल्याने जळलेल्या भागावर थंडावा मिळण्याबरोबरच जळजळ कमी होते. याशिवाय जळण्याची खूणही नाहीशी होते.

खोबरेल तेल

खोबरेल तेल थंड असते. प्रथमिक उपचार म्हणून जळलेल्या जागेवर खोबरेल तेल लावल्यास त्या जागेवर आराम मिळतो.

 

या गोष्टी टाळा

फटाक्यांमुळे जळलेल्या जागेवर कापूस कधीही लावू नये. यामुळे कापूस जखमेवर चिकटून राहून वेदना आणि जळजळ होऊ शकते. जखम उघडी ठेवा आणि आवश्यक असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.  

अनेकदा लोक फटाक्यांमुळे हात किंवा पाय जळत असेल तर त्यावर बर्फ ठेवतात. हे अजिबात करू नका, असे केल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT