Sandalwood Oil esakal
लाइफस्टाइल

Sandalwood Oil : उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्यांना घालवण्यासाठी चंदनाचे तेल आहे फायदेशीर, असा करा वापर

Benifit of Sandalwood Oil : दीर्घकाळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Sandalwood Oil : त्वचेची उत्तम प्रकारे निगा राखण्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करतो. आजकाल घरगुती उपायांसोबतच केमिकल्सनेयुक्त असलेली उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. या गोष्टींचा वापर ही महिलांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की आयुर्वेदामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या त्वचेचे सौंदर्य उत्तम प्रकारे राखण्यास मदत करतात.

या आयुर्वेदिक वनस्पतींपैकीच एक असलेली वनस्पती म्हणजे चंदन होय. दीर्घकाळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये चंदनाला त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.

चंदनाच्या तेलाचा वापर त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. खास करून मुरूमांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे तेल लाभदायी आहे. परंतु, या व्यतिरिक्त चंदनाच्या तेलाचे त्वचेला अनेक फायदे आहेत. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

टॅनिंगपासून आराम

चंदनाचा वापर केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते, हे बहुधा सगळ्यांनाच माहित आहे. उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होण्याचा धोका असतो. यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही चंदनाचा वापर करू शकता.

त्यासाठी चंदनाच्या तेलात किंवा चंदनाच्या पावडरमध्ये मध, लिंबाचा रस आणि दही मिसळून त्याची मऊ पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा.

मुरूम-पिंपल्सला दूर करते

चंदन हे नैसर्गिकरित्या थंड असते. त्यामुळे, मुरूम, पिंपल्स आणि चेहऱ्यावरील सूज, डागांची समस्या दूर करण्यासाठी चंदनाचे तेल उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी देखील चंदनाचे तेल फायदेशीर ठरते.

चंदनाच्या तेलाचा उपाय करण्यासाठी चंदनाच्या तेलात हळद आणि कापूर मिसळा. त्यानंतर, त्याची पेस्ट चेहऱ्यावरील मुरूमांवर लावा. रात्रभर असेच राहुद्या. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा.

सुरकुत्यांपासून सुटका मिळते

चंदनाच्या तेलात अँटी-ऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, फ्री रॅडिकल्सची समस्या कमी होण्यास मदत होते. चंदनाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचा सैल होत नाही, उलट चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. तरूण आणि चमकदार त्वचेसाठी चंदनाच्या तेलात मध, अंड्याचा पिवळा भाग मिसळा. आता याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, १५-२० मिनिटे चेहरा असाच ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT