Sarva Pitru Amavasya 2023  esakal
लाइफस्टाइल

Sarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री आमावस्येला या चूका टाळाच, नाहीतर पितृदोषाचा त्रास संपता संपणार नाही!

आपल्या अडचणींवर पितृशांती करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात

Pooja Karande-Kadam

Sarva Pitru Amavasya 2023 : हिंदू धर्मात पितृ पक्षाचे खूप महत्त्व आहे. 15 दिवसांच्या या कालावधीत, लोक त्यांच्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तारखेला श्राद्ध आणि तर्पण करतात, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतील.

लग्न, शुभ काम, प्रगतीच्या आडव्या येणाऱ्या अडचणी यांच्यावर मार्ग शोधताना पितृदोष आहे. हे वाक्य कधीतरी आपल्या कानावर पडतंच. पितृदोष मागे लागला की आपली प्रगती थांबते, सतत काहीतरी अडथळे येतात त्यावर पितृशांती करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात.

बरं ज्या लोकांना पितरांचे श्राद्ध कधी आहे याची निश्चित तारीख माहिती नसते. तेव्हा पितृपक्षात शांती करण्यास सांगितले जाते. दोन दिवसांनी सर्वपित्री अमावस्या आहे.

पितृ पक्ष अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो. या दिवशी लोक माहितीच्या अभावामुळे काही चुका करतात, ज्या टाळल्या पाहिजेत.

अमावस्येला अशाच लोकांचे श्राद्ध करा

सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध फक्त अशाच पितरांचे करावे ज्यांची मृत्यू तारीख तुम्हाला माहीत नाही. किंवा विसरली असेल. याशिवाय अमावस्येला मृत्युमुखी पडलेल्यांना तर्पण अर्पण करावे.

केस आणि नखे कापणे टाळावे

पितरांसाठी महत्त्वाचे असलेल्या या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे. ज्योतिषांच्या मते असे केल्याने पितृदोष होतो. या दिवशी कोणतीही नवीन खरेदी टाळावी. (Pitru Paksha 2023)

कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका

सर्वपित्री अमावस्येला दान घेण्यासाठी कोणीही तुमच्या दारात आले तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. अशी कोणतीही चूक तुमच्या पूर्वजांना नाराज करू शकते. दारात येणार्‍याला काहीतरी द्यायला हवे. तज्ज्ञांच्या मते, पितरांना या दिवशी पीठ, तांदूळ किंवा तीळ दान करणे शुभ मानले जाते. 

कोणाचाही अपमान करू नका

गरीब व्यक्तीला कधीही त्रास देऊ नका. हे चुकीचेच आहे. परंतु सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी चुकूनही हे करू नका. असे केल्याने तुम्ही केवळ त्याच्या शापाचेच धनी होणार नाही. तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या क्रोधालाही सामोरे जावे लागू शकते. या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना भाकरी आणि धान्य द्या.

या गोष्टींचे सेवन टाळा

संपूर्ण पितृ पक्षात तामसिक अन्न, मांस आणि मद्य टाळावे, परंतु सर्वपित्री अमावस्येला याची विशेष काळजी घ्यावी. याशिवाय लसूण, कांदा किंवा तामसिक पदार्थ खाणे टाळावे. या दिवशी मसूर, अंबाडी, हरभरा, इत्यादींचा समावेश असलेले अन्न शुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT