Sawan Vrat Food Sakal
लाइफस्टाइल

Sawan Vrat Food : श्रावणातील उपवास करता ‘हे’ हेल्दी ड्रिंक पिऊन शरीर ठेवा हायड्रेटेड

Sawan Vrat Diet श्रावण महिन्यातील उपवास करण्यामागे धार्मिक महत्त्व आहेच. पण याशिवाय शरीराची पचनसंस्था शुद्ध करण्याचीही संधी यानिमित्ताने मिळते.

सकाळ डिजिटल टीम

Sawan Vrat Food News श्रावण महिन्यातील उपवास हे भाविकांसाठी एक महत्त्वाचा उत्सव असतो. यावेळेस भक्तगण देवीदेवतांची आराधना करून उपवासही करतात. आध्यात्मिक साधना करून देवीदेवतांचे आशीर्वादही घेतात. श्रावणातील उपवास करण्यास धार्मिक महत्त्व लाभलेच आहेच.

पण याव्यतिरिक्त श्रावणातील उपवासाच्या निमित्ताने आपल्याकडे शरीर डिटॉक्स करण्याचीही मोठी संधी असते. या उत्सवामुळे आपणास शारीरिक व मानसिक आरोग्यासही अनेक लाभ मिळतात. तर मित्रांनो आपणही श्रावणातील उपवास करत असाल तर आहारामध्ये आरोग्यास लाभदायी असणाऱ्या पेयांचा समावेश करावा. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.

फळांचे सेवन करा

याव्यतिरिक्त आपण कलिंगड, काकडी आणि संत्रे यांसारख्या फळांचाही समावेश करू शकता. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे उपवासादरम्यान कॅफिन आणि साखरयुक्त पेय टाळावेत. कारण शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. परिणाम थकवा अधिक जाणवू शकतो.

कोणत्या पेयाचा डाएटमध्ये करावा समावेश?

तसे पाहायला गेले तर उपवासाकरिता आपण वेगवेगळ्या फळांचा ज्युसही पिऊ शकता. ज्यामुळे शरीर निरोगी व हायड्रेट राहते. पण ‘नारळाचे पाणी’ हे एक लोकप्रिय पेय आहे. यामुळे शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा होतो आणि शरीर हायड्रेटही राहते.

याव्यतिरिक्त आपण फळांचा रस, हर्बल टी,  साखर मिक्स न करता लिंबू पाणीही पिऊ शकते. या पेयांद्वारे शरीर हायड्रेट राहतेच शिवाय आवश्यक पोषक घटकांचा आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा देखील शरीराला पुरवठा होतो.  

खालील गोष्टीही लक्षात ठेवाव्यात :

  • उपवासादरम्यान थोड्याथोड्या अंतराने फराळेच सेवन करावे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात सुफरफूड्सचा समावेश करावा.

  • फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम या पोषकघटकांचा साठा असतो. ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते.

  • शरीर हायड्रेट राहण्यासाठी व शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकघटकांचा पुरवठा व्हावा याकरिता लस्सी, दूध आणि ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचाही आपण समावेश करू शकता.

  • उपवासादरम्यान दिवसभर उपाशी राहू नये.  फळे आणि सुकामेव्याचे सेवन करावे.   

  • पाककृती तयार करताना  रॉक सॉल्ट किंवा सेंध मिठाचा वापर करावा.

  • साखरऐवजी गूळ वापरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT