Self Confidence Tips
Self Confidence Tips Sakal
लाइफस्टाइल

Self Confidence Tips तुमच्या चांगल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेताहेत? मग स्वभावात करा हे बदल

Harshada Shirsekar

Self Confidence Tips : तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या संकटाच्या वेळेस मदतीसाठी धाऊन जाता पण जेव्हा तुम्हाला एखाद्याची गरज असते, त्यावेळेस मात्र कोणाकडेच वेळ नसतो; या वागणुकीमुळे तुमचे मन अधिक उदास होते का? तुम्ही जितके भरभरून माया-प्रेम मित्र-मैत्रिणींवर करता तितकेच महत्त्व तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून मिळत नाही? 

घडणाऱ्या या सर्व गोष्टींमुळे कोणालाही वाईट वाटणं साहजिकच आहे. एखाद्या नात्यामध्ये केवळ एकच व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत असेल आणि दुसरा व्यक्ती कामाव्यतिरिक्त तुमच्याशी संवाद साधत नसेल, तर ही भावना अतिशय दुःखदायकच आहे. 

तुमच्याही जीवनात अशाच काही गोष्टी घडत असतील तर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या स्वभावात आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.  

मर्यादा निश्चित करा

लोक तुम्हाला गृहीत धरत असतील तर तुम्हाला या नात्यामध्ये काही मर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला सांगा तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवे तसे वागणार असाल तर मला ते सहन करणं जमणार नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य द्यायला शिका. 

मदत मागितल्याशिवाय मदत करू नका

स्वतःहून कोणालाही मदत करायला जाऊ नये, कारण न मागता मदत केल्यास तो व्यक्ती तुम्ही केलेल्या मदतीची जाणीव ठेवत नाही. म्हणूनच एखाद्याला तुमच्या मदतीची आवश्यकता नसेल तर स्वतःहून मदतीचा हात पुढे करणं टाळावे.

प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जाणे तुमच्या जीवनासाठी हानिकारक ठरू शकते. स्वतःच्या आधी इतरांचा विचार करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही कित्येक नवनवीन संधींना मुकत आहात, हे लक्षात घ्या.

खासगी गोष्टी प्रत्येकाला सांगू नये

स्वतःच्या मनातील खासगी गोष्टी प्रत्येकाला सांगण्याची चूक करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्याप्रमाणेच चांगला असेलच याची खात्री देता येत नाही. तसंच बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला तुमच्यातील कमतरता कळू शकतात. म्हणून खासगी बाब कोणाशीही शेअर करू नका. 

प्रत्येकाचे सल्ले ऐकणे टाळा

प्रत्येकाचे सल्ले ऐकण्याची चूक करणं टाळा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होऊ शकतात.  सर्वांचे ऐकून घ्यायचे आणि स्वतःच्या मनाला जे पटेल तेच करावे; हे लक्षात ठेवा. आपले विचार स्पष्टपणे मांडायला शिका. स्वतःचा आदर करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. 

प्रत्येक वेळेस कमीपणा घेऊ नका

जवळच्या व्यक्तीसाठी काहीही करणं ही काही वाईट बाब नाहीय. पण तुम्ही जे काही करताय त्यास महत्त्व आहे का? सतत समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरतेय आणि तुमचा आदर करत नाहीय; तर अशी व्यक्ती तुमच्या मैत्रीस-प्रेमास पात्र आहे का? याचा शांतपणे विचार करा आणि सहन करत असलेल्या अन्यायातून स्वतःची सुटका करून घ्या.

जे लोक तुमच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाहीत, अशा व्यक्तींसमोरच तुमचे मन मोकळे करा. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT