how to make a natural hair mask
how to make a natural hair mask Esakal
लाइफस्टाइल

Shiny Hair हवेत मग अंड्यासोबत ही गोष्ट मिसळा आणि पहा कमाल

Kirti Wadkar

Natural Hair Mask: सुंदर लांब सडक आणि चमकणारे केस तर प्रत्येकालाच हवे असतात. मात्र अलिकडे प्रदूषण, बदलेली जीवनशैली तसचं आहार यामुळे केसांच्या समस्या Hair Problems निर्माण होवू लागल्या आहेत.

यासाठी महागडे प्राॅडक्ट आणि ट्रीटमेंटची Treatemtn मदत घेतली जाऊ शकते. मात्र यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागेल. शिवाय या प्राॅ़डक्टमधल्या केमिकल्समुळे ठराविक काळाने केसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढते. Shiny Hair Solution How To Get Rid Of Hair Fall

जर तुम्हाला शायनी हेअर Shiny Hair हवे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता. अंड्याचा हेअर मास्क Hair Mask वापरल्याने केसांना चागली चमक येते तसचं ते मजबूतही होतात.

अंड्यामुळे Eggs केसांना पुरेसं पोषण मिळतं. यामुळे रुक्ष केसदेखील मऊ होण्यास मदत होते. यासाठी आज आम्ही तुम्हाला अंड्याचे काही हेअर मास्क सांगणार आहोत.  Shiny hair solution

अंड आणि नारळाच्या तेलाचं हेअर सोल्यूशन- यासाठी साधारण दोन अंडी घ्या. एका बाऊलमध्ये २ अंडी आणि २-३ चमचे नारळाचं तेल घ्या.

अंडी आणि नारळाचं तेल चांगलं फेटून घ्या. द्या नंतर ते २-३ मिनिटांसाठी झाकून ठेवा. हे हेअर मास्क केसांना आणि केसांच्या मुळांना लाव. यासाठी तुम्ही हेअर ब्रशचा वापर देखील करु शकता. 

हा हेअर मास्क केसांना २० मिनिटं राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. यासाठी तुम्ही एखादा सौम्य शॅम्पू वापरु शकता. चांगल्या रिझल्टसाठी हा हेअरपॅक आठवड्यातून दोनदा तरी लावा. यामुळे केसांना चागली चमक येईल. Egg and coconut oil for shiny hair

अंड्यातील प्रोटीनमुळे केसांना आतून पोषण मिळेल. तर नारळाच्या तेलामध्ये असे अनेक पोषक गुणधर्म आहेत ज्यामुळे केस गळणं कमी होण्यापासून ते पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते. 

हे देखिल वाचा-

अंड आणि केळ्याचा हेअर मास्क- तुम्हाला तुमच्या केसांसाठी इस्टंट ग्लो हवा असेल तर हा हेअर पॅक एकदा तरी नक्की ट्राय करा. यासाठी एका वाडग्यात २ फेटलेली अंडी तसचं ३ चमचे मोहरीचं तेल आणि एक चांगलं कुस्करलेलं केळं घ्यावं.

हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. केस आणि स्कॅल्पला हा पॅक ४०-४५ मिनिटं ठेवावा. त्यांनतर केस हर्बल शॅम्पूने धुवावे. Home remedies for silky and shine hair 

या हेअर मास्कमुळे निस्तेज झालेले रुक्ष आणि पातळ केसही मजबूत होण्यास मदत होते. तसचं एका वापरात तुम्हाला फरक जाणवेल, या हेअर मास्कमुळे केसांना लगेचच चमक येईल. 

अंड आणि ऑलिव्ह ऑईल- जर तुमचे केस डॅमेज झाले असतील तर अंड्यामुळे केसांना पुरेस पोषण मिळू  शकतं. लांबसडक, काळ्या आणि दाट केसांसाठी अंड्याचं बलक अत्यंत फायदेशीर ठरतं. यातील विटामिन केसांचं नुकसान कमी करतात. तसचं केस वाढण्यास मदत करतात. 

यासाठी अंड्याच्या बलकामध्ये ऑलिव्ह आईल Olive Oil टाकून चांगलं फेटून घ्या. तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे अंड्याचं बलक आणि आईव्ह आईल समप्रमाणाच घ्यावं. त्यानंतर हा हेअर मास्क केसांना अर्धा तास लावून ठेवावा त्यानंतर केस धुवावे. या हेअर मास्कमुळे केसांना चांगली चमक येईल.

अंड, दही आणि मध- हा हेअर मास्क तयार करण्यासाठी  २ अंडी, २-३ चमचे दही आणि एक चमचा मध एकत्र करून हेअर मास्क तयार करावा. हा हेअर मास्क केस आणि केसांच्या मुळांना लावून अर्धा तास राहू द्यावा. त्यानंतर केस धुवावे. 

या हेअर मास्कमुळे तुमचे केस खुपच मऊ आणि चमकदार होतील. दह्यामुळे केसांना पुरेसं पोषण मिळेल तसचं त्यांना सॉफ्टनेस येईल. 

अंड आणि लिंबू- अंड आणि लिंबाचा हेअर मास्क लावल्याने केसांना चमक येण्यासोबत कोंड्याची समस्या दूर होते. तसचं घाम आणि प्रदूषणामुळे होणारं इंफेक्शव दूर होतं.

यासाठी २-३ अंड्याचे बलक घेऊन त्यात २ चमचे लिंबाचा रस मिसळून हेअर मास्क तयार करावा. हा हेअर मास्क केसाच्या मुळांना अर्धा तास लावून ठेवाना. त्यानंतर केस धुवावे. 

लिंबामध्ये असलेल्या विटामीन सी आणि बी तसचं अँटीऑक्सिडंट्समुळे केस पूर्णपणे स्वच्छ होतात. केसातील कोंडा दूर होतो. तसचं यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. 

या हेअर मास्कसोबतच तुम्ही नुसतं अंडदेखील फेटून ते केसांना लावू शकता. फेटलेलं अडं केसांना अर्धा तास लावून त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवावे. यामुळे देखील केसांनी चागली चमक येईल. तसचं केस मऊ होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT