showering with contacts lenses  
लाइफस्टाइल

डोळ्यांना लेन्स लावून अंघोळ करताय? मग आधी हे वाचा

लेन्स लावून अंघोळ करणं पडेल महागात

शर्वरी जोशी

आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव म्हणजे डोळे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणं आणि निगा राखणं गरजेचं आहे. डोळ्यात धूळ, कचरा गेल्यास डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच सतत कॉम्प्युटर, लॅपटॉप यांच्यावर काम केल्यासदेखील डोळ्यांना त्रास होऊ शकतो. आजवर लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्या स्क्रीनच्या संपर्कात आलेल्या अनेकांना डोळ्यांविषयी तक्रारी निर्माण झाल्या आहेत. यात अनेकांना चष्मादेखील लागला आहे. परंतु, काही जण चष्मा वापरण्याऐवजाी कॉन्टेक्ट लेन्स वापरण्याचा पर्याय निवडतात. काह जण सकाळी उठल्यापासूनच लेन्स लावून बसतात. पण, जर तुम्ही सकाळी आंघोळ करतांनादेखील लेन्स लावत असाल तर वेळीच थांबा. कारण, लेन्स लावून अंघोळ करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.

ब्रिटीश संशोधकाने लेन्स वापरणाऱ्या ७८ जणांवर एक रिसर्च केला. त्यानुसार, लेन्स घालून अंघोळ करणाऱ्यांमध्ये डोळ्यांविषयी जास्त समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.तसंच वेळीच योग्य उपचार न केल्यास व्यक्तींना अस्पष्ट व धुसर दिसत असल्याचंही या संशोधनात समोर आलं.

हेही वाचा : त्रासदायक झुरळांपासून करा सुटका; वापरा सोप्प्या ६ टीप्स

अंघोळ करतांना लेन्स वापरल्यामुळे विषाणूंचं संक्रमण डोळ्यात पसरतं. अंघोळ करतांना लेन्स ओले होतात. ज्यामुळे लेन्सवरील ओलाव्यावर विषाणू चिकटून राहतात व हळूहळू त्यांच्या संक्रमणाचा स्तर वाढत जातो.

झोपतांनाही लेन्स वापरु नका.

ज्या पद्धतीने अंघोळ करतांना लेन्स लावणं चुकीचं आहे. तसंच झोपेच्या बाबतीतही आहे. झोपतानादेखील लेन्स काढून ठेवावेत. कारण, झोपेत असताना विषाणू किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता तीन पटीने वाढली असते. याला वैज्ञानिक भाषेत मायक्रोबिअल किरेटाइटिस म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT