Relationship google
लाइफस्टाइल

Relationship Tips : तुमचा जोडीदार स्वार्थी असल्याची ही आहेत लक्षणे; वेळीच सावध व्हा !

जर तुमच्या जोडीदाराला फक्त तुम्ही केलेल्या गोष्टी आठवत नसतील. किंवा त्याने तुमच्यासाठी काय केले याची आठवण करून देत असेल तर अशा वेळी सावध रहा.

नमिता धुरी

मुंबई : नात्यात एकमेकांच्या सुख-दु:खाची काळजी घेणे खूप गरजेचे असते. यामुळे नात्यातील प्रेमाचा गोडवा कधीच कमी होत नाही.

परंतु बरेचदा लोक चुकून अशा एखाद्याच्या बंधनात अडकतात जो त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी आणि गरजांसाठी लक्षात ठेवतो. विचार करा तुमचा जीवनसाथी असा निघाला तर काय होईल ? (signs of selfish partner know your partner )

सामान्यतः स्वार्थी जोडीदाराशी तडजोड करूनच आयुष्य घालवता येते. त्यामुळे कधी कधी नाती तुटतात. अशा परिस्थितीत, हे टाळण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या त्या गोष्टी तुम्ही आधीच लक्षात घ्या, ज्यात त्यांचा समावेश स्वार्थी लोकांच्या श्रेणीत होतो. येथे आम्ही तुम्हाला स्वार्थी व्यक्तींची काही लक्षण सांगत आहोत. हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

केवळा स्वत:च्या कम्फर्टचा विचार

जर तुमच्या जोडीदाराला फक्त स्वतःच्या आरामाची काळजी असेल, तर तुम्ही स्वार्थी व्यक्तीसोबत नात्यात आहात. अशी माणसे गरज पडल्यावर तुमच्या सोयीकडे दुर्लक्ष करण्याआधी एकदाही विचार करत नाहीत. बहुतेकांना लग्नानंतर जोडीदाराच्या या स्वभावाची माहिती होते जेव्हा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात.

स्वत:ची प्रशंसा करणे

स्वार्थी लोक फक्त स्वतःमध्येच चांगले पाहतात. जर त्याने तुमच्यासाठी काही केले तर तुम्ही त्याची स्तुती करण्याआधीच तो स्वतःची हजार वेळा स्तुती करतो.

जर तुमच्या जोडीदाराला फक्त तुम्ही केलेल्या गोष्टी आठवत नसतील. किंवा त्याने तुमच्यासाठी काय केले याची आठवण करून देत असेल तर अशा वेळी सावध रहा.

नेहमी वैयक्तिक अनुभवातून बोलणे

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा अनुभव असतो, ज्याच्या आधारे तो स्वतःसाठी योग्य-अयोग्य ठरवतो. अशा परिस्थितीत, जर नातेसंबंधात आल्यानंतर, तुम्हाला प्रत्येक निर्णय तुमच्या जोडीदाराच्या अनुभवाच्या आधारे घ्यावा लागतो, तर याचे कारण तुमच्या जोडीदाराचा स्वार्थी स्वभाव असू शकतो.

चुकीची माफी मागण्याऐवजी रागावणे

चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात. पण आपली चूक कळूनही कोणी माफी मागितली नाही तर वाईट वाटते. जर तुमचा जोडीदारही त्याच्या चुकांसाठी सॉरी म्हणत नसेल किंवा त्याच्या चुकांबद्दल बोलताना रागावला असेल तर तो स्वार्थी स्वभावाचा असू शकतो.

मदतीसाठी जोडीदाराचे कौतुक न करणे

आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला इतरांच्या मदतीची आणि साथीची गरज असते. ऑफिसला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर घरी शिजवलेले अन्न मिळत असेल, तर तोही एक प्रकारचा आधारच आहे.

पण असे केल्याने तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला कधी कौतुक मिळाले आहे का ? नाही तर तुम्ही स्वार्थी माणसासोबत आयुष्य जगत आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT