dirty bed sheets and skin health issues sakal
लाइफस्टाइल

सावधान! घाणेरड्या बेडशीटमुळे होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या, इतक्या दिवसांनी बदलावं अंथरूण

Bedsheet Hygiene Tips : घाणेरड्या बेडशीटवर हजारो डेड स्किन सेल्स, धूळ, तेल इत्यादी गोष्टी जमा होतात. ज्यामुळे संसर्ग होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Health Issues And Bedsheets : अंथरूणामुळेही आरोग्यास नुकसान पोहोचू शकते, हे आपणास माहिती आहे का. आपल्या बेडवर दीर्घकाळापासून अंथरलेल्या बेडशीटमुळे आरोग्याच्या कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात.

घाणेरड्या बेडशीटवर हजारो डेड स्किन सेल्स, धूळ-माती, तेल, घाम, खरकटे इत्यादी दुर्गंधयुक्त गोष्टी जमा होतात. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. बेडशीटमुळे आरोग्यास अपाय होऊ नये, याकरिता नेमके किती दिवसानंतर अंथरूण बदलणे गरजेचं असते, ज्यामुळे आजारांपासून सुटका होऊ शकते ; याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

आरोग्यास अपाय होऊ नयेत म्हणून एकदिवस आड बेडशीट बदलणे फायदेशीर ठरेल. दुसरीकडे दम्याची समस्या असणाऱ्या रूग्णांनी विशेषतः अंथरूणांची स्वच्छता करण्यावर भर देणे गरजेचं आहे. अन्यथा यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. ज्या लोकांच्या शरीराला खूप घाम येतो, त्यांनी दर एक दिवसाने अंथरूण बदलावे.

बेडशीट न बदलल्यास होणारे नुकसान 

- जर आपण सलग एक आठवडा एकाच बेडशीटचा वापर केला तर बॅक्टेरिया, बुरशीचे, जंतूमुळे आजारांची लागण होण्याची शक्यता असते. घाणेरड्या बेडशीटमुळे त्वचेशीही संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ एक्झिमा, मुरूम येणे, त्वचा लाल होणे, त्वचेशी संबंधित संसर्ग होणे इत्यादी 

- स्लीप एपनिया सिंड्रोम म्हणजे झोपेत श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे सर्दी होणे, शिंका येणे तसंच घोरण्याच्या समस्याचांही सामना करावा लागू शकतो.  म्हणून नियमित स्वरुपात गरम पाण्यात डिटर्जेंट मिक्स करून अंथरूण भिजत ठेवावे आणि काही तासांनंतर बेडशीट स्वच्छ धुऊन काढावे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT