skin care follow tips to keep your skin glowing during monsoon season  
लाइफस्टाइल

Beauty Tips: पावसाळ्यात घ्या चेहऱ्याची विशेष काळजी; 'या' टिप्समुळं काळी पडणार नाही त्वचा

पावसाळा हा ऋतू आनंद देणारा असला तरी हाच ऋतू आपल्यासमोर अनेक समस्या उभा करत असतो.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात आरोग्यासोबत चेहऱ्याचीही काळजी घेण खुप महत्त्वाचं आहे. पावसाळा हा ऋतू आनंद देणारा असला तरी हाच ऋतू आपल्यासमोर अनेक समस्या उभा करत असतो. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना पावसाळ्यात अधिक जपावे लागते. नाहीतर त्वचेवर पुरळ, खाज होणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. मग अनेक महागडे प्रोडक्टकडे आपले पावले वळतात. तर तुम्हाला आम्ही अशा काही खास गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे पावासाळ्यातही तुमचा चेहरा ग्लो करेल.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्सिडेंट आहे, जो आपल्या शरीरास रोग आणि विषारी पदार्थांशी लढण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे. त्याच्या मदतीने त्वचेवरील काळे डाग आणि काळी वर्तुळे दूर होऊ शकतात. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करा.

ग्रीन टी

ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगले आहे. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हे अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यात आणि त्वचेचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. ग्रीन टीचा नियमित वापर केल्यास पिंपल्स आणि काळ्या डागांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

गुलाबपाणी

पावसाळ्यात गुलाबपाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुलाब पाण्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपण कमी होण्यास मदत होईल. गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी चांगले काम करते. यासोबतच, तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी गुलाबपाणी खूप प्रभावी आहे.

नारळाचे तेल

खोबरेल तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलाने कोरडेपणाची समस्या दूर होते आणि त्वचेवर आर्द्रता टिकून राहण्यासही मदत होते. नारळाचे तेल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, पावसाळ्यात त्वचेला बॅक्टेरिया आणि संक्रमण मुक्त ठेवण्यास देखील खूप मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT