Home Made Face Pack: आंगणातील तुळशीत एवढे गुण आहेत की तुमच्या प्रत्येक समस्या दूर होऊ शकतील. थंडीत सर्दी दूर करण्यापासून ते तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यापर्यंत तुळशीची पानं गुणकारी आहे. आज आपण तुळशीचा घरीच फेसपॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. ज्याने तुमच्या चेहऱ्यावर अभिनेत्रींसारखा ग्लो येईल.
तुळशीचा फेस पॅक बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्या.
आधी तुळशीच्या पानांना वाळवून त्याचं पावडर बनवून घ्या. त्यानंतर या पद्धतींनी तुम्ही फेसपॅक बनवू शकता.
तुळस आणि हळद
हळद स्किनला क्लिंझ करण्यासाठी चांगली असते. हदळ आणि तुळस चेहऱ्यावर सोबत लावल्याने टॅनिंग आणि पिगमेंटेशन कली होते. यासाठी तुळशीच्या पानांचं पावडर आर्धा चमचा हळदीत मिसळवून त्याचा फेसपॅक बनवा. हा फेसपॅक चेहऱ्याला १० ते १५ मिनीट लावा.
तुळशी आणि दूध
चेगऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील या फेसपॅकचा वापर तुम्हाला करता येईल. यासाठी बाउलमध्ये दोन चम्मच तुळशीचं पावरड आणि एक चम्मच दूध घेत त्याची पेस्ट बनवा. १५ मिनीट चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
तुळशी आणि कडूनिंब
तुमच्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतील तर हा फेसपॅक गुणकारी ठरेल. समान प्रमाणात तुळशी आणि कडूनिंबाच्या पानांचं पावडर पाण्यात मिक्स करत त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. १० मिनीटानंतर चेहरी धुवून घ्या.
तुळशी आणि बेसन
सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि तुळशीचा फेसपॅक लावा. यात दोन चमचे तुळशीच्या पावडरमध्ये १ चमचा बेसन आणि एक चमचा भरून मध टाका. हा फेसपॅक १५ मिनीट चेहऱ्याला लावून ठेवा. (Beauty)
या काही उपायांनी तुमचा चेहरा अगदी टवटवित दिसेल.
डिस्क्लेमर- तुमची स्किन सेंसिटीव्ह असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.