Skin Care esakal
लाइफस्टाइल

Skin Care : मेकअपने नाही तर पनीरने दिसा ग्लोइंग, शेहनाज हुसेनने सांगितलं ब्युटी सिक्रेट

आहारातल्या निष्काळजीपणामुळे ज्या गोष्टी चेहऱ्यावर उमटतात त्या लपवण्यासाठी मेकअपचा उपयोग होतो. पण खरा ग्लो आहारातून मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

Skin Freindly Foods For Glow : आहारातल्या निष्काळजीपणामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या परिणामांना झाकण्यासाठी मेकअपचा उपयोग होतो. पण खरा ग्लो आंतरीक असतो असं म्हणतात, त्याला प्रसिध्द ब्युटीशियन शेहनाज हुसैन पण दुजोरा देते. त्यामुळे मेकअप च्या आधी आपल्या आहार आणि पोषणावर भर द्या.

पोषणाविषयी जे फॅक्ट्स समोर येतात तेव्हा आंतरीक स्वास्थ्य आणि बाहेरील सौंदर्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं जाणवतं. आरोग्य, संतुलीत आहार शरीराला पोषक तत्व मिळतात. यामुळे आरोग्य सुधारतं आणि त्याचं तेज चेहऱ्यावर येतं. मऊ, चमकदार त्वचा, परफ्क्ट फिगर, शक्ती या गोष्टी आपल्या आहारावर अवलंबून असतात.

skin care

ऑयली स्कीनसाठी असं घ्या डाएट

बध्दकोष्ठता आणि त्वचेतून नीट उत्सर्जन होत नसल्याने पिंपल्स येतात. जर ऑयली स्कीन असेल तर ब्लॅकहेड, डाग आणि पिंपल्स होऊ शकतात. तर आहार बऱ्याच प्रमाणात फायबर घेणे आवश्यक आहे. साखर, स्टार्च आणि तळलेले पदार्थ खाणं कमी करावं आणि कच्चे पदार्थ खाण्याचा प्रमाण वाढवावं. यात ताजी फळं, कच्च सलाग, मोड आलेली धान्ये. योग्य प्माणात पाणी प्या. सकाळी सगळ्यात पहिले लिंबाचा रस घ्या.

skin care

डेअरी प्रॉडक्ट परिणामकारक

दही उत्तम ब्युटी फूड आहे. तर स्किम्ड मिल्क, पनीर हे सुध्दा स्कीनसाठी फार उपयुक्त आहेत. पालेभाज्यांचं सेवन वाढवा. फाळांचा, भाज्यांचा ताजा रस घ्या. सिस्टीम साफ आणि शुद्द ठेवण्यासाठी मदत करतं

मेकअप नाही तर पोषणावर द्या भर

आरोग्य खराब असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर, त्वचेवर दिसूनच येतो. मग तुम्ही किती पैसे कमवतात किंवा मेकअप वर किती पैसा घालवतात यामुळे काही फरक पडत नाही. प्रत्येक जण सुंदर आहे. जर तुम्ही आरोग्याची नीट काळजी घेतली तर त्याचं तेज चेहऱ्यावर नक्कीच उतरतं. आणि हेच खरं सौंदर्य असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT