Rose Water Sakal
लाइफस्टाइल

Skin Care : गुलाब पाण्यात चुकूनही मिक्स करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

जवळजवळ प्रत्येक मुलीच्या ब्यूटी किटमध्ये गुलाब पाण्याची छोटीशी बॉटल कायम असतेच. गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला चमकही येते.

Aishwarya Musale

जवळजवळ प्रत्येक मुलीच्या ब्यूटी किटमध्ये गुलाब पाण्याची छोटीशी बॉटल कायम असतेच. गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला चमकही येते. कधी ते टोनर म्हणून वापरले जाते तर कधी फेस पॅकमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावले जाते. पण अनेक वेळा आपण अशा गोष्टींसोबत गुलाबपाणी वापरतो ज्यामुळे त्वचेला आणखी नुकसान होते. म्हणून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुलाबपाणी लावण्यापूर्वी माहित असणे आवश्यक आहे.

लिंबासोबत गुलाबपाणी वापरू नका

लिंबू आणि गुलाबपाणी एकत्र कधीही वापरू नये. याचे कारण असे आहे की त्यात अ‍ॅसिड प्रॉपर्टीज जास्त असतात. ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू नये. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी याची विशेष काळजी घ्यावी.

बेकिंग सोडा वापरू नका

तुम्ही गुलाबपाणी थेट त्वचेवर लावू शकता. पण बेकिंग सोडा सोबत कधीही वापरू नका. कारण ते लावल्याने तुमच्या त्वचेची पीएच पातळी बदलू शकते. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी दिसू लागते. ज्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा येतो. त्यामुळे त्यामध्ये गुलाबपाणी कधीही मिसळून चेहऱ्याला लावू नका किंवा त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

फेशिअल ऑईलसोबत लावू नका

जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर गुलाबपाणी अजिबात वापरू नका. अन्यथा तुमची त्वचा अधिक कोरडी दिसेल. हे दोन्ही एकत्र लावल्याने तुमच्या त्वचेवर मुरुमांसारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात. म्हणून ते एकत्र न वापरण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, तरच तुमची त्वचा निरोगी राहील. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT