Skin Care Tips  Esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips: फक्त 5 मिनिटांत दिसाल फ्रेश; ट्राय करा या टिप्स

Skin Care Tips: दिवसभराच्या कामाच्या थकव्यानंतर रात्री पार्टीत फ्रेश दिसणं (Look Fresh) एक आव्हान असते.

सकाळ ऑनलाईन

Look Fresh in Party :

दिवसभराच्या मेहनतीनंतर पार्टीला जाणे खूप निराशाजनक आहे. तुम्ही जरी पार्टी अटेंड करायचं ठरवलं तरी दिवसभराच्या कामाचा ताण तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. अशा थकलेल्या चेहऱ्याने पार्टी एन्जॉय करणं खूप अवघड असते. या चेहऱ्यावर कितीही मेकअप केला तरी तो तसाच दिसतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Skin Care Tips) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फ्रेश लुक देऊ शकता.

1. गुलाब पाणी वापरा (Rose Water)-

सर्वप्रथम गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ करा. गुलाबजल खूप हायड्रेटिंग असते आणि त्वचेला चमकदार बनवण्याचा अद्भुत गुण त्याच्यात असतो. यासाठी तुम्हाला काही विशेष मेहनतही करावी लागणार नाही, तुम्हाला फक्त एक कापूस गुलाब पाण्यात बुडवून घ्यावा लागेल आणि त्यानंतर संपूर्ण चेहरा स्वच्छ करावा लागेल. असे केल्याने चेहरा फ्रेश (Face Looks fresh) दिसेल आणि तुमचा मूड सुधारण्यास मदत होईल.

2. फेस पॅक (Face Pack)-

चेहरा स्वच्छ केल्यानंतर मधाने बनवलेला फेस पॅक लावा. त्यात थोडी मसाज करा आणि काही काळ राहू द्या. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी असतात, जे त्वचेला पोषण देतात. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा आणि ताजेतवाने वाटेल.

3. मालिश (Massage)-

चेहरा (Face) मुलायम बनवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. यासाठी चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT