स्किन केअरसाठी फुलांचा वापर Esakal
लाइफस्टाइल

या फुलांचा Skin Care मध्ये करा समावेश, फुलासारखीच सॉफ्ट होईल त्वचा, रंग देखील उजळेल

फुलांच्या वापरामुळे देखील त्वचेच्या समस्या दूर होऊन त्वचा मऊ, उजळ होवून त्वचेवर ग्लो येऊ शकतो. आपल्या आसपास मिळणाऱ्या किंवा अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही फुलांपासून तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता

Kirti Wadkar

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. काहीजण बाजारात मिळणाऱ्या स्किन केअर प्राॅडक्ट Skin Care प्रोडक्टला पसंती देतात. तर काही जण मात्र घरगुची उपाय करणं पसंत करतात. Skin Care Tips in Marathi use these flowers to cure naturally

त्वचेची काळजी Skin Care घेत असताना कायम कमीत कमी केमिकल्स असलेले प्राॅडक्ट वापरणं किंवा खास करून नैसर्गिक Natural Products गोष्टींचा वापरणं करणं हे केव्हाही फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. शिवाय हे तुमच्या खिशाला देखील परवडणारं असतं.

त्वचेसाठी नैसर्गिक उपाय करत असताना आपण अनेकदा आपल्या स्वयंपाक घरातील Kitchen विविध वस्तू म्हणजेच, हळद, बेसन, दूध यांचा वापर करतो. पण तुम्हाला माहित आहे का त्वचा मऊ आणि उजळ व्हावी यासाठी तुम्ही फुलांचा देखील वापर करू शकता.

होय, फुलांच्या वापरामुळे देखील त्वचेच्या समस्या दूर होऊन त्वचा मऊ, उजळ होवून त्वचेवर ग्लो येऊ शकतो. आपल्या आसपास मिळणाऱ्या किंवा अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही फुलांपासून तुम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता.

झेंडुचं फूल- झेंडूच्या फुलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या आणि मुरम कमी होण्यास मदत होते. २-३ झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये १ चमचा गुलबापाणी टाकून बारीक वाटून घ्या. यासाठी तुम्ही मिक्सरमध्ये देखील पेस्ट तयार करू शकता.

या पेस्टमध्ये १ चमचा अॅलोवेराजेल टाका. आता हा फेसपॅक चेहऱ्याला १०-१५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा या फेसपॅकचा वापर करा.

गुलाबाचं फूल- स्किन केअरमध्ये गुलाबाचा वापर पुर्वापार होत आला आहे. अनेक स्किन केअर प्राॅडक्टमध्ये देखील गुलाबाचा वापर होतो. गुलाबातील गुधधर्मांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसचं कोरडी किंवा रुक्ष त्वचा असलेल्यांसाठी हा गुलाबाच्या फुलांचा फेसपॅक फायदेशीर ठरतो.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी गुलाबाची पानं काही तासांसाठी दुधामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर याची पेस्ट तयार करा. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मध टाका. या फेसपॅक चेहऱ्याला १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा.

या फेसपॅकमधील मध आणि दुधामुळे त्वचा मऊ होवून त्वचेवर ग्लो येण्यास मदत होईल.

जास्वंदींचं फूल- पूजेसाठी किंवा गणरायाला अर्पण करण्यात येत असलेल्या जास्वंदींच्या फूलाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. केस मजबूत आणि दाट होण्यासाठी देखील जास्वंदीच्या फूलांचा वापर केला जातो. जास्वंदीच्या फुलांमध्ये अँटीएजिंग गुणधर्म असतात.

तसंच जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेल्या ऑर्गेनिक अॅसिड्मुळे नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून ते चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरतं. तसचं प्रखर सुर्य किरणांमुळे त्वचेचं होणारं नुकसान भरून काढण्यास तसचं काळे डाग दूर करण्यास जास्वदीचं फूल मदत करत.

यासाठी जास्वंदीच्या फूलाची १-२ चमचा गुलाबपाणी घेऊन पेस्ट तयार करा. तुम्ही जास्वंदीची पावडर देखील वापरू शकता. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला २० मिनिटांसाठी लावून ठेवा. या फेसपॅकमुळे चेहरा स्वच्छ होवून उजळण्यास मदत होईल.

अशा प्रकारे आपल्या सभोवताली सहज मिळणाऱ्या फुलांचे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त फायदे आहेत. तेव्हा खर्च न करता तुम्ही या फुलांचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करा.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT