Slap Therapy esakal
लाइफस्टाइल

Slap Therapy : स्वत:च स्वत:ला चापट मारून घेण्याचेही फायदे? त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर

स्लॅप थेरपी कशी करावी?

Pooja Karande-Kadam

Slap Therapy :

आपली त्वचा सुंदर आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अनेक सौंदर्य उत्पादने वापरतात. तरूण दिसण्यासाठी चेहऱ्याची अनेक उत्पादने आणि सौंदर्य उपचार बाजारात उपलब्ध आहेत. परंतु काहीवेळा ही उत्पादने त्वचेला हानी पोहोचवतात. जर तुम्हाला कोणतेही क्रिम न वापरता सुंदर त्वचा मिळवायची असेल तर त्यासाठी एक गोष्ट करू शकता. ती म्हणजे स्वत:च्या गालावर चापट्या मारून घेणं होय.

आरशासमोर उभे राहून चापट्या मारताना तुम्हाला कोणी पाहिलं तर लोक खुळ्यात काढतील. तूम्हाला वेड्यासारखं काहीतरी करत आहात असे म्हणतील. पण जेव्हा तूम्ही या स्लॅप थेरपी बद्दल त्यांना सांगाल. तेव्हा ते स्वत:ही चापट्या मारून घेत बसतील.

आजकाल, काही देशांमध्ये, एक थेरपी महिलांमध्ये प्रचलित आहे, ज्याला स्लॅप थेरपी म्हणतात. आम्ही तुम्हाला सांगतो की या थेरपीमध्ये चेहऱ्याला हलक्या हातांनी मारले जाते. या प्रक्रियेचे आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे आहेत.

स्लॅप थेरपी म्हणजे काय?

स्लॅप थेरपीमध्ये त्वचेला हलक्या हातांनी चापट मारली जाते. त्वचेवर चापट मारल्याने रक्ताभिसरण वाढते. यामुळे त्वचा तरुण आणि निरोगी होते. अनेक स्त्रिया ही थेरपी करतात.  

स्लॅप थेरपीचे फायदे

  • चेहऱ्यावर हलक्या हाताने चापट मारल्याने त्वचा मऊ होते.

  • प्लम्पर त्वचेवर स्लॅप थेरपी घेतल्याने त्वचेची लहान छिद्रे उघडतात आणि सुरकुत्या कमी होतात.

  • चापट मारल्याने चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात आणि रक्त प्रवाह देखील वाढतो.

  • स्लॅप थेरपी तुमच्या त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि चेहरा अधिक चमकदार बनवते.

  • स्लॅप थेरपीसह त्वचेवर लावलेली क्रीम, सीरम किंवा तेल सहजपणे शोषले जाते.

  • चेहऱ्यावर चापट मारल्याने त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

  • हलक्या हातांनी थप्पड मारल्याने पिंपल्ससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

स्लॅप थेरपी कशी करावी?

ही थेरपी करताना तुम्हाला हातांच्या प्रेशरबाबत काळजी घ्यावी लागते. हलक्या हातांनी चेहऱ्यावर 50 चापट मारा. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी ही थेरपी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्ही ही थेरपी स्वतःही करू शकता आणि सलून किंवा स्पामध्ये जाऊन ती करून घेऊ शकता. हे करण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर चेहऱ्याला हलकेच चापट मारा.

स्लॅपिंग थेरपी खूप लोकप्रिय होत आहे

स्लॅप थेरपीचा उगम कोरियामध्ये अनेक वर्षांपूर्वी झाला. सुंदर त्वचा मिळविण्यासाठी कोरिया आणि अमेरिकेतील महिला स्लॅप थेरपीचा अवलंब करतात. हळूहळू ही थेरपी प्रसिद्ध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT