Sleeping  Esakal
लाइफस्टाइल

Sleeping Tips: कोणत्या अवस्थेत झोपणे असते चांगले;वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स?

कामाचे टेन्शन आणि कौटुंबिक ताण यामुळे लोकांना झोप येत नाही. 

सकाळ डिजिटल टीम

निरोगी आयुष्यासाठी चांगल्या आहारासोबतच चांगली झोपही खूप महत्त्वाची आहे. पण लोकांना चांगली झोप येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. शक्य असतं तर लोकांनी झोपही विकत घेतली असती. कारण, कामाचे टेन्शन आणि कौटुंबिक ताण यामुळे लोकांना झोप येत नाही. 

तुमच्या शरीरासाठी चांगली झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुमची जीवनशैली कशी आहे यावर तूमची झोप अवलंबून असते. त्यामुळेच तुम्ही कोणत्या अवस्थेत झोपावे, म्हणजे तूम्हाला चांगली झोप येईल. याबद्दल जाणून घेऊयात.

एक्सपर्ट्सचा सल्ला

एक्सपर्ट्सच्या मते, पालथे पोटावर झोपणे, सतत पाठीवर झोपणे किंवा एकाच बाजूला झोपल्याने घोरण्याची सवय आणि स्लीप एपमियाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पाठीच्या दुखण्याची सुरूवातही होते. जर, तूम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत असाल तर, झोपमोड होणे, टेंशन वाढणे, रक्ताभिसरण चुकीच्या पद्धतीने होणे यांचा सामना करावा लागू शकतो. 

याबद्दल एक्सपर्ट्स, असा सल्ला देतात की, झोप पुर्ण न झाल्याने आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ते इम्यूनिटी आणि मेटाबॉलिजमवर वाईट प्रभाव पाडते. त्यामुळे झोप पुर्ण व्हावी यासाठी आपण कोणत्या पोझिशनमध्ये झोपावे हे पाहुयात.

● पाठीवर झोपणे 

पाठीवर झोपणे हि झोपण्याची एक कॉमन पोझिशन आहे. असे झोपल्याने तुमच्या पाठीचा कणा नैसर्गिक अवस्थेत राहतो. याचबरोबर मान, पाठ आणि खांद्यातील दुखण्याचा त्रास होत नाही.

● एका अंगावर झोपणे

एका अंगावर झोपणे हे अतिशय आरामदायक मानले जाते. वयोवृद्ध लोक अधिक असे झोपत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. एका अंगावर झोपल्याने शांत झोप लागते आणि पाठीचा कणा सरळ रेषेत राहतो.  

● असे झोपू नका 

रिसर्चनुसार, पोटावर किंवा छातीवर झोपणे हानिकारक ठरते. या अवस्थेत झोपल्याने आपल्या फुफुस आणि छातीवर दबाव पडतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT