Stress free Weekend Esakal
लाइफस्टाइल

Lifestyle Tips : Stress Free Weekend एन्जॉय करण्यासाठी या टिप्स करा फॉलो, आठवडाही जाईल मजेत

आपलं काम सांभाळून मानसिक आरोग्य Mental Health जपण्यासाठी विकेण्डचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. या विकेण्डला जर तुम्ही स्ट्रेस फ्री राहिलात आणि विकेण्डची मजा लुटली तर तुम्हाला पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळेल

Kirti Wadkar

Lifestyle News : सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येकाचं आयुष्य हे धकाधकीचं झालं आहे. आपलं ध्येय गाठण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी तर कधी व्यवसायात Business यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी अशा विविध कारणांसाठी अनेकजण रोज अनेक तास कष्ट करत असतात. Smart Marathi Tips for Stress Free Weekend to relax your mind

आठवडाभर ऑफिसमध्ये किंवा इतर कामांमध्ये सतत तणावाखील Tension काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी देखील अनेकजण कामाच्या तणावातच राहतात. ज्यामुळे सुट्टीचे दिवसही ते एन्ज़ॉय करत नाहीत.

सोमवार ते शुक्रवार काहीजण तर अगदी शनिवारपर्यंत ऑफिसात सकाळ ते संध्याकाळ काम करतात. अनेकांच्या तर कामाच्या तासांची चौकटही ठरलेली नसते.

१० तास १२ तास अगदी काहीवेळेस १४-१५ तासही काम करावं लागतं. त्यानंतर येणाऱ्या विकेण्डला Weekend जर तुम्ही पुन्हा कामाच्या टेन्शनमध्येच दिवस घालवणार असाल तर तुम्ही तणावात किंवा काही वेळेस नैराश्यातही जाऊ शकता.

आपलं काम सांभाळून मानसिक आरोग्य Mental Health जपण्यासाठी विकेण्डचा योग्य उपयोग करणं गरजेचं आहे. या विकेण्डला जर तुम्ही स्ट्रेस फ्री राहिलात आणि विकेण्डची मजा लुटली तर तुम्हाला पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि तुमचा तणावही कमी होईल. यासाठीच विकेण्ड स्ट्रेस फ्री कसा ठेवता येईल यासाठी काही गोष्टींची दखल घ्या.

स्वत:ला आराम द्या

रोजच्या धावपळीत अनेकदा पुरेसा आराम करण्यासाठी अनेकाना वेळच मिळत नाही. कामाचा ताण, अपुरी झोप याचा मानसिक आरोग्यावर तसचं शारीरीक आरोग्यावरही परिणाम होत असतो. यासाठीच विकेण्डला चांगली रेस्ट घ्या. म्हणजेच पुरेशी झोप आणि चांगला आराम होईल असं प्लॅनिंग करा. सुट्टीच्या दिवशी तुम्ही दुपारची झोप घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगला आराम करता येईल.

तसंच पार्लर किंवा स्पामध्ये जाऊन हेड मसाज किंवा बॉडी मसाज घेतल्याने तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि चांगली झोपही येईल.

स्वतःला वेळ द्या

अनेकदा विकेण्डला आपण मित्र परिवारासोबत किंवा कुटुंबियांसोबत एखादा प्लॅन आखतो. जर तुम्ही एखादा आऊटींगचा प्लॅन आखत असाल तर तुम्ही जरी मजा लुटलीत तरी तुम्हाला आराम न मिळाल्याने पुढील आठवडा तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठीच प्रत्येक विकेण्डला घराबाहेर राहण्याचे किंवा संपूर्ण विकेण्ड व्यापला जाईल असे प्लॅन न आखता महिन्यातील २-३ विकेण्ड तरी स्वत:ला वेळ द्या.

जर तुम्हाला शनिवार-रविवार सुट्टी असेल तर शनिवारी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ घालवून रविवारचा दिवसा आराम करण्यासाठी किंवा स्वत:साठी ठेवू शकता. स्वत:साठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही विकेण्डला तुमचं आवडीचं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला आवडत असलेला एखादा सिनेमा किंवा एखादी वेब सीरिज बिंज वॉच करू शकता.

तसंच एखाद-दोन तास एकटेच शॉपिंगला जाऊ शकता. तसंच सकाळी किंवा संध्याकाळी एखादा वॉक घ्या. यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाट्टेल.

हे देखिल वाचा-

आवडीचं आणि हेल्दी खा, हॅप्पी रहा

आवडीचे पदार्थ खाल्ल्याने मन आनंदी राहतं. मात्र रोजच्या धावपळीत अनेकांना घरचा डब्बा नेणं शक्य होतं नाही. तर बरेचजण कुटुंबापासून दूर राहून नोकरी करत असल्याने हॉटेल, मेस, टिफिन सर्विसेस यावर अवलंबून रहावं लागतं. अशावेळी मनाजोग्या किंवा आवडीचे पदार्थांऐवजी पोटभरण्यासाठी मिळेल ते खाण्याची अनेकांवर वेळ येत. शिवाय आठवडाभर बऱ्याचदा जंकफूड किंवा बाहेरचं अन्न खावं लागतं.

यासाठीच सुट्टीच्या दिवशी शक्य असल्यास तुमच्या आवडीचे पदार्थ घरी बनवा. गाणी एका. किंवा गाणी ऐकत स्वयंपाक करा. त्यानंचर या आवडीच्या पदार्थांची मजा लुटा.

हे देखिल वाचा-

मित्र मैत्रिणींना भेटा, संवाद साधा

कामाच्या धावपळीत आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबाला वेळ देणं शक्य होतं नाही. अनेकदा कामाचा ताण आणि इतरांशी किंना जीवलगांशी भेटीगाठी न झाल्याने एकाकीपणा येतो. यासाठी थोडावेळ तुम्ही मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासाठी काढू शकता. जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून गप्पा गोष्टी केल्याने तुमचा ताण कमी होवू शकतो.

तसंच तुम्ही कुटुंबापासून लांब रहात असाल तरी व्हिडीओकॉल किंवा फोन कॉल करून त्यांच्याशी संवाद साधा. जुन्या मित्रपरिवाराशी फोनकॉलवरही तुम्ही संवाद साधू शकता.

अशा प्रकारे तुम्ही महिन्यातले सर्व विकेण्ड योग्य प्रकारे प्लॅन केले तर तुम्हाला आराम करण्यासोबतच कुटुंबासाठी वेळ देणं आणि विकेण्ड एन्जॉय करणं देखील शक्य होईल. शिवाय यामुळे तुम्ही तणावमुक्त रहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT