Snacks Recipe  esakal
लाइफस्टाइल

Snacks Recipe : बटाट्याची साल फेकू नका, त्यापासून बनवा ही सोप्पी क्रिस्पी आणि क्रंची स्नॅक्स रेसिपी

बटाट्याच्या सालीचे अनेक फायदे आहेत

सकाळ डिजिटल टीम

Snacks Recipe :

बटाट्याची भाजी प्रत्येक घरात बनवली जाते. बटाट्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक भाजीत स्वत:ला ऍडजस्ट करतो. एखाद्या भाजीत मीठ जास्त झालं तर उकडलेला बटाटा त्यात मॅश करून घातल्याने ती भाजी खारट लागत नाही.

बटाट्याची भाजी तुम्ही नेहमीच खाल्ली असेल पण, बटाट्याच्या सालीपासून बनलेली एक चटपटीत रेसिपी आज आपण पाहणार आहोत. (Potato Peel)

तुम्हाला माहीत आहे का बटाट्याच्या सालीचे अनेक फायदे आहेत. बटाट्याची त्वचा व्हिटॅमिन सी, बी लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध मानली जाते. याव्यतिरिक्त तुमची त्वचा, केस आणि हाडे सुधारण्यास मदत करू शकते. (Recipe)

यासाठी लागणारे साहीत्य-

  • बटाट्याची साल

  • जीरा पावडर

  • लाल तिखट

  • मीठ आणि तेल

कृती

  1. सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.

  2. त्यानंतर या साली एका भांड्यात घेऊन त्याला जिरे पावडर, लाल तिखट आणि मीठ चोळून घ्या.

  3. यानंतर गॅसवर कढईत तेल तापायला ठेवा. तेल कडक झालं की बटाट्याच्या साली त्यामध्ये तळून घ्या.

  4. साधारण १० मिनिटे मंद आचेवर तळून घ्या. ज्यामुळे बटाट्याच्या साली अधिकच कुरकुरीत होतील.

  5. तुम्ही फ्रेंच फ्राईजसारखेच सॉस, ग्रीन चटणी, मेयोनिजसोबत या आगळ्या वेगळ्या पोटॅटो पील चिप्स एन्जॉय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT