Solkadhi Recipe esakal
लाइफस्टाइल

Solkadhi Recipe : कडक उन्हाळ्यात गारेगार व्हायला सोलकढी हवीच,जाणून घ्या सोपी रेसिपी

सोलकढी रेसिपी: सोलकढी करताना ही गोष्ट मिक्स करा,तिचा रंग छान दिसेल...

सकाळ डिजिटल टीम

Solkadhi Recipe :

 उन्हाळ्यात थंड सरबत आणि ज्यूसची घरी रेलचेल असते. घरी आलेल्या पाहुण्यांना थंडगार करण्यासाठी सोलकढीही करू शकता. सोलकढी जेवणानंतर पिणे फायद्याचे असते. कारण, आमसुलातील पोषक तत्व जेवण पचवण्यास मदत करतात. पण उन्हाळ्यातही तिचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

तुम्ही ही सोलकढी बनवून फ्रिजमध्ये ठेऊ शकता. ज्यामुळे कधी पाहुणे मंडळी आली. तर ही सोलकढी पिऊन ते तृत्प होतील. सोलकढी अगदी कमी वेळेत तयार होते.

साहीत्य -

मूठभर अमसुले भिजवून, २ हिरव्या मिरच्या व ३ ते ४ लसूण पाकळ्या वाटून, १ नारळ वाटून दूध काढून अंदाजे ५ वाट्या, मूठभर कोथिंबीर बारीक चिरून, चवीनुसार मीठ.

कृती :

  • मूठभर अमसुले कोमट पाण्यात भिजवून २ ते ३ तासाने त्याचा उतरलेला अर्क अमसुले हाताने पाण्यात थोडी कालवून गाळून घ्यावा.

  • १ नारळ वाटून अंदाजे ५ वाट्या दूध काढून गाळून घ्यावे.

  • नारळाचे दूध व अमसुलाचे पाणी मिसळावे व त्यात लसूण, मिरची वाटून घालावी.

  • चवीनुसार मीठ घालावे व कोथिंबीर घालून ढवळावे.

  • सोलकढी गारच सर्व्ह करायची. उकळायची अजिबात नाही. माशांच्या जेवणाबरोबर प्लेन भाताबरोबर सर्व्ह करावी.

  • सोलकढी पातळ असते. जास्त आंबट करू नये. त्याकरता आमसुले कमी घ्यावीत. तसेच हवे असेल तरच साखर घाला.

टिप्स -

अमसुले कुस्करून रस काढू नये. रंग काळपट होतो.

नारळाचे दूध मिक्सरमध्ये काढत असताना त्यामध्यो कोमट पाणी वापरावे.

नारळाच्या दुधात एक वाटी साधे दूध वापरावे याने नारळाच्या दुधाला पांढराशुभ्र रंग येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT