Somvati Amavasya 2024 esakal
लाइफस्टाइल

Somvati Amavasya 2024 : शास्त्रात सर्वश्रेष्ठ आहे सोमवती आमावस्या, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

अमावस्येला सुर्यग्रहण हा अद्भूत योगायोग मानला जात आहे

सकाळ डिजिटल टीम

 Somvati Amavasya 2024 :

जेव्हा कालनिर्णय अस्तित्वात नव्हतं त्या काळा पोर्णिमा-आमावस्येवरून कालगणना केली जायची. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला येणारी पोर्णिमा आणि अमावस्येला महत्त्व आहे. या अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे.

यंदा एप्रिल महिन्यात सोमवती अमावस्या आहे. या दिवशी सुहासिनी महिला व्रत करतात. तर या दिवशी पवित्र गंगेत स्नान करणेही शुभ मानले जाते. (Somvati Amavasya 2024)

विशेष म्हणजे यंदाच्या सोमवती अमावस्येदिवशी सुर्यग्रहणही आहे. नुकत्याच झालेल्या होळी पौर्णिमेला चंद्र ग्रहण अन् त्यापुढील अमावस्येला सुर्यग्रहण हा अद्भूत योगायोग मानला जात आहे. त्याच निमित्ताने सोमवती अमावस्या कधी आहे, त्यादिवशी पूजा कशी केली पाहीजे याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

सोमवती अमावस्या ८ एप्रिलला आहे. सोमवारी म्हणजे आठ तारखेला सकाळी ८ वाजून २१मिनिटांनी अमावस्येला सुरूवात होणार आहे. तर त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अमावस्येचा काळ संमाप्त होणार आहे.

सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याची प्रथा आहे. स्नान अन् दान करण्यासाठी ८ तारखेला पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांचा ब्रह्म मुहूर्त विशेष आहे.  या ब्रह्म मुहूर्ताची समाप्ती पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी होईल.

सोमवती अमावस्येचे व्रत कसे करावे

सोमवती अमावस्येचे व्रत करणाऱ्या सुहासिनी महिला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात. माता पार्वतीला सौभाग्याचं लेण, दागिने, बांगड्या, साडी चोळी अर्पण केली जाते. तसेच, वैवाहिक जीवनातील अडचणी या व्रताच्या प्रभावाने दूर होतात अशी भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT