Home Tips
Home Tips esakal
लाइफस्टाइल

Home Tips : भिंतीवरील जाळ्यांनी वैतागलात? 'या' ट्रिक्स वापरा, लगेच मिळेल सुटका

सकाळ डिजिटल टीम

लोक आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. फरशी रोज झाडली, पूसली जाते. पण सीलिंग, छताची रोज सफाई करता येत नाही. त्यामुळे कोळी भिंती आणि छताला आपले घर बनवून घेते. पांढऱ्या रंगाची ही जाळी घरात घाण दिसतात. वास्तूनुसार त्याला अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरातही अशी जाळी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पांढरे व्हिनेगर

बहुतेक घरांमध्ये पांढऱ्या व्हिनेगरचा किचनमध्ये वापर होतो. या पांढऱ्या व्हिनेगरने तुम्हला या जाळ्यांपासून सुटका मिळू शकते. यासाठी व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर जाळ्यांवर हा स्प्रे मारा. व्हिनेगरच्या उग्र वासाने कोळी तिथे जाळं बनवणार नाही.

लिंबू आणि संत्र्याचे साल

लिंबू आणि संत्र्याचे साल यातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. त्यापासूनही कोळी दूर पळतात. म्हणून जिथे जाळी धरली जातात तिथे त्याचे साल ठेवता येऊ शकतात. त्याच्या वासाने कोळी तिथे येणार नाही.

निलगिरी तेल

निलगिरी तेल बाजारात सहज उपल्बध्द असते. एका स्प्रे बॉटलमध्ये निलगिरी तेल भरून जाळ्यांवर स्प्रे करावे. यामुळे कोळी तिथून पळून जाईल.

पुदिना

पुदिन्याचाही वास तीव्र असल्याने जाळ्यावर याचाही उपाय होतो. पुदिन्याची पाने बॉटलमध्ये भरून स्प्रे करावे. पाण्याऐवजी पुदिन्याचे ऑईलही भरून स्प्रे करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती... एक जागतिक दिवास्वप्न!

SCROLL FOR NEXT