Stamina Boosting  esakal
लाइफस्टाइल

Stamina Boosting : चालताना श्वास दाटून येतो? या पद्धतींचा वापर करून स्टॅमिना नॅचरली बूस्ट करा

ज्या लोकांचा स्टॅमिना कमी असतो त्यांना चालताना दम लागण्याची किंवा थकवा येण्याची तक्रार असते

साक्षी राऊत

Stamina Boosting : काही लोक तंदुरुस्त राहण्यासाठी वॉकला जातात, तर काहीजण व्यायामाच्या मदतीने तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, व्यायाम करताना किंवा वॉ़कला गेल्या नंतर अगदी काही वेळात त्यांना प्रचंड थकवा जाणवतो. हे तुमच्या कमकुवत स्टॅमिनामुळे असू शकते.आता स्टॅमिना म्हणजे काय तर तुमची कुठलीही अॅक्टिव्हिटी करण्याची क्षमता.

शारीरिक किंवा मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी कोणत्याही वयात चांगला स्टॅमिना असणे गरजेचे आहे. ज्या लोकांचा स्टॅमिना कमी असतो त्यांना चालताना दम लागण्याची किंवा थकवा येण्याची तक्रार असते. तुमच्यासोबतही असे होत असेल तर या लेखात जाणून घ्या स्टॅमिना वाढवण्याचे नैसर्गिक उपाय.

स्टॅमिना नॅचरली कसा वाढवाल?

हायड्रेटेड राहा - जर तुम्हाला वारंवार उर्जा कमी वाटत असेल तर ते डिहायड्रेशनमुळे असू शकते. म्हणूनच द्रव पदार्थांचे सेवन वाढवणे आणि ठराविक अंतराने पाणी पिणे महत्त्वाचे आहे. याशिवाय रोज नाश्त्यात एक ग्लास बीटरूट ज्यूस पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. (Energy)

एनर्जी वाढवणाऱ्या गोष्टी खा - एनर्जी वाढवणारे पेय पिण्याव्यतिरिक्त काही खाद्यपदार्थ खा जे तुमची एनर्जी लेव्हल वाढवतात. आयुर्वेदिक औषधी वनस्पती, जसे की अश्वगंधा, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

खाण्याच्या वेळेची काळजी घ्या - जेवणामध्ये योग्य वेळेचे अंतर ठेवा. तुम्ही काय खाता आणि ते खाण्याची योग्य वेळ जपा. खाद्यपदार्थ खाण्याची एक वेळ ठरवून ठेवा जेणेकरून तुमची एनर्जी लेव्हल नियंत्रणात राहील. (Health)

नाश्ता वेळेत करा - तुमचा दिवस फ्रेश मूडने सुरू करा. नाश्ता पौष्टिक असेल तर तुमची एनर्जी लेव्हल टिकून राहते. शक्य असल्यास, ओट्स किंवा गव्हाची ब्रेड आणि अंडी आपल्या नाश्त्याचा एक भाग बनवा.

वेळेत झोपा - स्टॅमिना वाढवण्यासाठी झोपेचे रूटीन फॉलो करा. अवेळी झोपणे, दिवला झोपणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT