Raksha Bandhan sakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024: वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो देशातील प्रत्येक राज्यात रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या

भारतात फक्त श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात नाही, तर देशातील विविध राज्यांमध्ये या दिवशी वेगवेगळ्या नावाने सण साजरे केले जातात.

Aishwarya Musale

रक्षाबंधनाच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. रक्षाबंधनाच्या सणाची चमक बाजारात दिसू लागली आहे.

बहिणींनी राखी खरेदी करणे सुरू केले असून दूरवर राहणाऱ्या भावांसाठी मिठाई, भेटवस्तू, राखी पार्सलची आवक सुरू झाली आहे.

रक्षाबंधन हा असा एक सण आहे, जो देशातील सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो. भारतात रक्षाबंधन हा सण सर्व राज्यांमध्ये आपापल्या परंपरेनुसार आणि संस्कृतीनुसार साजरा केला जातो.

पण तुम्हाला माहित आहे का की रक्षाबंधनाचा हा सण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

रक्षाबंधन सणाचे वेगवेगळे नाव

पश्चिम भारत

सर्व राज्यांच्या आणि प्रदेशांच्या बोलीभाषा, भाषा, संस्कृती, राहणीमान वेगवेगळे असल्याने उत्सवाचे स्वरूप वेगळे असणे स्वाभाविक आहे. पश्चिम भारतात रक्षाबंधनाचा सण नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

या दिवशी समुद्र परिसरात राहणारे मच्छीमार भगवान वरुण आणि भगवान इंद्राची पूजा करून समुद्रात नारळ टाकतात.

उत्तर भारत

भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये या सणाला कजरी पौर्णिमा म्हणतात. कजरी पौर्णिमेच्या दिवशी, शेतकरी आपल्या शेतात पिकांची लागवड करताना चांगल्या पीक आणि उत्पन्नासाठी दुर्गादेवीची प्रार्थना करतात.

दक्षिण भारत

दक्षिण भारतीय राज्यांमध्ये या सणाला अवित्तम म्हणतात. या दिवशी लोक जुना धागा काढून नवीन धागा घालतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये असे मानले जाते की असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

गुजरात

गुजरातमध्ये या सणाला पवित्रोपन्ना म्हणतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणात भगवान भोलेनाथाची पिंडी कापसात गुंडाळून पंचगव्याने बांधली जाते.

पश्चिम बंगाल

राखी बंधन, राखी/झुलन पौर्णिमा

पंजाब, हरियाणा, चंदीगड

राखी/रक्षा बंधन, राखी पौर्णिमा

तमिळ

राखी विझा

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड

रक्षाबंधन

महाराष्ट्र

राखी पौर्णिमा

तामिळनाडू

अवनी अवित्तम

आंध्र प्रदेश, तेलंगणा

राखी पौर्णिमा

केरळा

सुथा पूर्णिमा

ओडिशा

गम्हा पूर्णिमा

राजस्थानी

राखी / रक्षाबंधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT