लाइफस्टाइल

मानसिक ताण कमी होण्यासाठी आहारात करा व्हिटॅमिन C चा समावेश

व्हिटॅमिन C मुळे होईल मानसिक ताण दूर

शर्वरी जोशी

अनेक शारीरिक दुखण्यामागे मानसिक ताण हे महत्त्वाचं कारण असू शकतं. मानसिक ताण आल्यावर चिंता, निद्रानाश, वजन वाढणे, भूक मंदावणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर मुळात मानसिक ताण कमी करणं गरजेचं आहे. मानसिक ताण निर्माण होण्यामागे अनेक कारणं असतात. मात्र, त्या ताणाचं नियोजन कसं करायचं हे आपल्या हातात आहे. जर तुम्ही जेवताना सुद्धा सतत विचार करत असाल तर सहाजिकच मनावर ताण येऊन हे विचार सतत तुमच्या डोक्यात व मनात घोळत राहतात. म्हणूनच, मानसिक ताण नियंत्रणात आणण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच व्हिटॅमिन C चं सेवन केल्यामुळे मानसिक ताण नियंत्रणात येतो असं दिल्लीतील प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी सांगितलं आहे. म्हणूनच, व्हिटॅमिन C चं सेवन केल्यावर मानसिक आरोग्य कसं निरोगी राहतं ते पाहुयात. (stress-reducing-foods-consuming-foods-rich-in-just-this-vitamin-c-can-take-your-stress-away-from-the-root-ssj93)

आहारात करा व्हिटॅमिन C चा समावेश

मानसिक ताण कमी करायचा असेल तर आहार आणि लाइफस्टाइल या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मानसिक ताण नियंत्रणात आणण्यासाठी आहारात व्हिटॅमिन C युक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन C मध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडेटचं प्रमाण असतं. त्यामुळे चिंता, मानसिक ताण कमी करण्यास मदत होते, असं डॉ. लवनीत म्हणाल्या.

व्हिटॅमिन C कोणत्या पदार्थांमधून मिळेल?

शरीरातील व्हिटॅमिन C ची कमतरता भरुन काढण्यासाठी आहारात लिंबू, आवळा, बेलपेपर, स्ट्रॉबेरी यांचा समावेश केला पाहिजे.

व्हिटॅमिन C च्या सेवनाचे फायदे -

व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, माइंड फंक्शन, त्वचा यांचं आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT