Successful People Habits esakal
लाइफस्टाइल

Successful People Habits: बिल गेट्स, रतन टाटांसारखं श्रीमंत व्हायला त्यांच्यासारखं वागायला लागतंय; सकाळी उठून करा ही कामं!

जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात

Pooja Karande-Kadam

 Successful People Habits : रोज पहाटे अनेक लोकं गाढ झोपेत असतात. तेव्हा ते स्वप्नात हरवलेले असतात. स्वप्नात ते लोक काही क्षणासाठी का होईना पण श्रीमंत झालेले असतात. पण जेव्हा ते झोपेतून उठतात. तेव्हा ते स्वप्न भंग होतं. आणि ते रोजचं आयुष्य जगायला लागतात.   

जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असते. बिल गेट्स, एलन मस्क, रतन टाटा, मुकेश अंबानी आणि मार्क झुकेरबर्ग यांनी यश मिळावे आणि जगावर राज्य करावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र अनेकदा लाइफ मॅनेजमेंटच्या अभावामुळे यश आपल्या हातून निसटत जाते.

तुम्हालाही बिल गेट्स, एलन मस्क, रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासारख्या लोकांप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही बदल करा. दररोज सकाळी उठल्यानंतर आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत.

एखादी व्यक्ती ही केवळ त्याच्या कृतीमुळे नव्हे, तर त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सवयी यामुळे श्रीमंत होत असल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात. या सवयीच त्यांना श्रीमंत बनवतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवून देत राहत असल्याचं सिद्ध झालं आहे.

सूर्य उगवण्याआधीच उठणे

यशस्वी लोक कोणत्याही अलार्मशिवाय सकाळी लवकर उठतात. त्यांच्या शरीराला गरज असलेली आठ तासांची झोप ते पुर्ण घेतात आणि लवकर उठतात. त्यामुळे तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच लवकर उठण्याची सवय लावून घ्या.

सकाळी पाणी पिणे

श्रीमंत आहेत म्हणून उठल्या उठल्या नाश्ता, खमंग पदार्थांवर ताव न मारता हे लोकं केवळ पाणी पितात. श्रीमंत लोकं आपल्या दिवसाची सुरुवात पाण्याने करतात. तो सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी पितो, त्यानंतरच ते चहा-कॉफी नाश्ता करतात.

आरोग्य जपा

यशस्वी लोक नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ते कितीही व्यस्त असले तरी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नक्कीच चांगले राहते. निरोगी राहण्यासाठी तो आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये व्यायामाचा नक्कीच समावेश करतो.

वेळेचा सदुपयोग करा

यशस्वी लोक आपला वेळ वाया घालवणे टाळतात.ते रोज आपल्या महत्त्वाच्या कामांची यादी तयार करतो आणि तो पूर्ण करण्यात आपला वेळ घालवतो.

चांगली पुस्तकं वाचा 

पुस्तकं आयुष्य घडवतात असं म्हणतात. आणि वर्तमानपत्र आपल्याला अपडेट ठेवतात. त्यामुळे श्रीमंत लोकांसारखं व्हायचं असेल तर पुस्तकं वाचत रहा.  

सकाळच्या वेळी निर्णय घ्या

बिझनेस किंवा आयुष्याशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल. तर सकाळच्या वेळी ते शांत डोक्याने लिहीतात. कारण, सकाळी आपल्या डोक्यात काही विचार नसतात. तेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करून मग त्यावर निर्णय घेणं सोप्प होतं.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT