Summer Animal Care Sakal
लाइफस्टाइल

Summer Animal Care: तुमच्याही घरी पाळीव प्राणी असेल तर उन्हाळ्यात 'अशी' घ्या काळजी

तुमच्याही घरी पाळीव प्राणी असतील तर उन्हाळ्यात त्याची खास पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Summer Animal Care important animal care tips for pet owners

अनेक लोकांना पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. घरात मांजर, कुत्रा, गाय यासारखे अनेक प्राणी पाळता येतात. यामुळे घरात एक वेगळाच आनंद असतो. पण काही लोकांना या प्राण्यांची उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याची माहिती नसते. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात आपल्याला उन्हाचा त्रास होतो तसाच त्रास प्राण्यांना देखील होतो. यामुळे प्राण्यांची कोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • योग्य आहार

पाळीव प्राण्यांना मानवांप्रमाणेच योग्य आणि पोषक आहाराची गरज असते. कुत्रा, मांजर, गाय या प्राण्यांसाठी वेगवेगळा आहार बनवला जातो. पाळीव प्राण्यांना योग्य भांड्यांमध्ये खायला द्यावे. पाळीव प्राण्यांना मीठ, लसूण आणि कांदे खायला देऊ नका. यामुळे ते आजारी पडून मृत्युमुखी पडू शकतात.

पाळीव प्राण्यांना आवश्यक प्रमाणात खायला द्यावे. पाळीव प्राण्याला जास्त खायला दिल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. ज्यामुळे हृदय, किडनीसंबंधित समस्या आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पशुवैद्यांकडून माहिती घेऊन आहार द्यावा.

  • राहण्याची योग्य जागा

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांची थंड ठिकाणी राहण्याची सोय करावी. यामुळे त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही. पाळीव प्राण्यांसाठी सावली आणि थंडावा असेल अशा ठिकाणी राहण्याची सोय करावी.

  • स्वच्छ पाणी

उन्हाळ्यात माणसांना जसे पाण्याची गरज असते तशीच पाळीव प्राण्यांना देखील असते. या दिवसांमध्ये पाळीव प्राण्यांना थंड आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावे. प्राण्यांचे पाणी पिण्याचे भांडे स्वच्छ ठेवावे. पुरेसे पाणी मिळाल्याने पाळीव प्राणी निरोगी, हायड्रेटेड आणि आनंदी राहतात.

  • पाळीव प्राणी तंदुरुस्त ठेवावे

आजकाळ बाजारांमध्ये पेट हाऊस असल्याने कोणतेही पाळीव प्राणी खेरदी करू शकतो आणि घरी पाळू शकतो. जसे लहान बाळांना खेळायला खेळणी हवी असतात तशीच पाळीव प्राण्यांना देखील खेळण्यासाठी काही गोष्टी हव्या असतात. यामुळे त्यांचे शारिरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. कुत्रा, मांजर यांना खेळण्यासाठी बॉल खेळायला देऊ शकता.

  • पशुवैद्याची मदत

पाळीव प्राण्यांची तसापणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पशुवैद्यकाकडे जावे. तुमचा कुत्रा किंवा मांजर माणसांपेक्षा कमी आयुष्य असल्यामुळे त्यांची वर्षातून किमान एक किंवा दोनदा आरोग्य तपासणी केली पाहिजे. जेव्हा तुमचा पाळीव प्राणी लहान असतो, तेव्हा त्यांच्या लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार त्यांना अधिक वेळा पशुवैद्याकडे नेऊ शकता. यामुळे पाळीव प्राण्यांचे आरोग्य निरोगी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT