Summer Foods esakal
लाइफस्टाइल

Summer Foods : उन्हाळ्यात पिकलेला आंबा नाहीतर कच्ची कैरी खा, कारण...

कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते. पण, आंबट असल्याने खोकला लागतो

सकाळ डिजिटल टीम

Summer Foods :

फळांचा राजा आंब्याचा सिझन सुरू झाला की सगळे लोक मिळेल तितका आंबा खाऊन घेतात. कारण उन्हाळ्याचे तीन महिनेच हे फळ बाजारात मिळते. आंबा उष्ण पदार्थ असतो त्यामुळे तो खाल्ल्याने अनेकांना आरोग्याच्या तक्रारी व्हायला लागतात. पण, कच्ची कैरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.

कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते. पण, ति आंबट असल्याने दात आंबतात, खोकला लागतो असे अनेकांना होते. त्यामुळेच, कच्ची कैरी खायला कोणी पाहत नाही. पण तिचे फायदे आणि खाण्याची पद्धत योग्य असली तर त्याला काहीही साईड इफेक्ट होत नाही.  

कच्चा आंबा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तुम्हाला पुन्हा पुन्हा संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करते.

यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो, कच्च्या आंब्यात मिळणारे व्हिटॅमिन सी, ई आणि ए त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. (Raw mangos for health)

कच्चा आंबा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण फुगवणे, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. यामध्ये नैसर्गिक पाचक एन्झाईम्स असतात जे अन्नाचे योग्य पचन करण्यास मदत करतात.

कच्च्या आंब्यामध्ये पेक्टिन असते ज्यामुळे आतडे निरोगी होतात. यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहण्यासही मदत होते.

कैरीत व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते. जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करावा. हे लोहाच्या कमतरतेला सामोरे जाण्यास मदत करते कच्चा आंबा उष्माघाताचा धोका कमी करतो.

कच्च्या कैरीत असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात प्रेग्नेंसीमध्ये कच्चा आंबा खाणे देखील फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारख्या व्हिटॅमिन-खनिजांचा हा एक चांगला स्रोत आहे.

कच्ची कैरी अशी आहारात समाविष्ट करा

  • कैरीचे पन्ह

  • डाळ कैरी

  • कैरीची चटणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Firing Video : थायलंड हादरलं!, सशस्त्र हल्लेखोराचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ओलीस ठेवलं

Vande Mataram: ६ श्लोक, २५ ओळी, ३.१० मिनिटे... राष्ट्रगीतापूर्वी पूर्ण वंदे मातरम् अनिवार्य; गृह मंत्रालयाचा नवा आदेश लागू

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राणीच्या बागेत पांढरे सिंह, चित्ते, झेब्रा पाहायला मिळणार; कधीपासून?

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT