Summer Skin Care esakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care : कड्याक्याच्या उन्हातही रिफ्रेशिंग चेहरा हवा असेल तर आजच करा हा सोपा उपाय

आज आम्ही तुम्हाला असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्याने भर उन्हातही तुमची स्किन अगदी रिफ्रेशिंग दिसेल

सकाळ डिजिटल टीम

Summer Skin Care : उन्हाळा येताच स्कीन अतिशय डल आणि निस्तेज दिसू लागते. उन्हामुळे अनेकांची स्कीन आईलीसुद्धी दिसते. उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने तुमची स्कीनदेखील हायड्रेट व्हायला लागते. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्याने भर उन्हातही तुमची स्किन अगदी रिफ्रेशिंग दिसेल.

मधाचा सोपा उपाय

मध आणि काकडीच्या मदतीने तुम्ही स्किन हायड्रेटिंग मास्क बनवू शकता. काकडीमधे पाण्याचं जास्त प्रमाण असतं. काकडी तुमच्या स्कीनला आतून पोषण प्रदान करते. तर मध स्किनला नरीश करण्यात मदत करते. चल तर मग फ्रेश चेहऱ्यासाठी स्किन हायड्रेटिंग मास्क कसं बनवायचं ते जाणून घेऊया.

स्किन हायड्रेटिंग मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ काकडी (Cucumber)

२ चमचे मध

असे बनवा स्किन हायड्रेटिंग मास्क

  • स्किन हायड्रेटिंग मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बाउल घ्या.

  • त्यात एक काकडी चांगल्याप्रकारे किसून घ्या.

  • त्यानंतर त्यात १-२ चमचे मध घाला.

  • नंतर या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • तुमचा स्किन हायड्रेटिंग मास्क आता लावण्यासाठी तयार आहे.

स्किन हायड्रेटिंग मास्क चेहऱ्यावर असा अप्लाय करा

स्किन (Skin Care) हायड्रेटिंग मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.

त्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर मास्क लावा.

यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून कोरडे करा.

मास्क डोळ्यांना स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या.

त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा.

सर्वोत्तम परिणामांसाठी, हा मुखवटा आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरून पहा.

त्याच्या सतत वापराने, तुमचा चेहरा हायड्रेटेड आणि स्वच्छ दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस अन् तेल कधी स्वस्त होईल? अमेरिका-इराण युद्ध संपायला किती वेळ लागेल?

आरोग्याचे ‘बाळ’कडू : थायराॅइडविषयक आजार

Koyna Dam: शासनाचा मोठा निर्णय! कोयना धरणातील पाणी उपशावर बंदी; परिस्थिती चिंताजनक, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

ढिंग टांग : बैठकीची मसलत..!

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार?; ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; पक्ष एकसंध असल्याचा राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT