Summer Skin Care Tips For Men Sakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care Tips For Men: उन्हाळ्यात पुरुषांचीही त्वचा होऊ शकते टॅन, स्किन केअर रूटिनमध्ये करा 'असा' बदल

Summer Skin Care Tips For Men: पुरूषांनी उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Summer Skin Care Tips For Men how to take care of skin in summer

उन्हाळ्यात फक्त महिलांनाच नाही तर पुरूषांनाही त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. कारण सुर्याच्या तीव्र किरणांचा नकारात्मक परिणाम त्वचेवर होतो. अनेक पुरूष त्वचेची काळजी घेत नाहीत पण,असे करणे चुकीचे आहे.

प्रत्येकाची त्वचा संवेदनशील असते. अनेक पुरूष कामानिमित्त घराबाहेर असतात. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्वचा खराब होऊ शकते. यामुळे पुरूषांना उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया

  • दाढी करू नका

उन्हाळ्यात रोज दाढी करणे टाळावे. कारण दाढी केल्याने सुर्यप्रकाश थेट त्वचेच्या संपर्कात येतो. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर चे केस जास्त काढू नका. दाढी केल्यानंतर आफ्टर शेव्ह वापरावे. यामुळे त्वचेतील आद्रता टिकून राहते आणि सुर्याच्या अतिनिल किरणांपासून बचाव होतो.

  • स्क्रब

उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करू शकता. यामुळे त्वचा आणि छिद्रांमध्ये लपलेली घाण सहज स्वच्छ होते. स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करावे. यामुळे त्वचा स्वच्छ दिसेल.

  • टोनर वापरावे

उन्हाळ्यात पुरूषांनीही टोनर वापरावे. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

  • सनस्क्रीन वापरा

महिलांप्रमाणेच पुरूषही सनस्कीन वापरू शकतात. उन्हाळ्यात बाहेर जाताना सनस्कीन वापरावे. यामुळे त्वचा ट्रन होणार नाही. सुर्याच्या अतिनिल किरणांचा त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही. सनस्कीन त्वचेच्या प्रकारानुसार आणि उच्च एसपीएफ पाहून खरेदी करावा.

  • मॉइश्चराइझर

उन्हाळ्यात मॉइश्चराइझर वापरत नसाल तर वापरायला सुरूवात करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. मॉइश्चराइझर चांगल्या दर्जाचे वापरल्यास, काळे डाग, मुरूम यासारख्या समस्येपासून बचाव होतो.

  • पाण्याचा वापर

महिलांपेक्षा पुरुष कामानिमित्त घराबाहेर जास्त राहतात. काही लोकांचे काम फक्त प्रवास करणे असते. यामुळे उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा तुमची त्वचा पाण्याने स्वच्छ धुवावी. यामुळे त्वचा आणि छिद्रांमध्ये साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT