Summer Skin Care
Summer Skin Care Sakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care: उन्हाळ्यात त्वचेसाठी केळीचा असा करा वापर, नैसर्गिकरित्या मिळेल चमक

पुजा बोनकिले

Summer Skin Care

बदलत्या वातावरणामध्ये त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचे संबंधित अनेक समस्या सुरू होतात. खास करून महिला त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध प्रोडक्ट वापरतात, तर त्या इतर अनेक उपाय देखील करतात. या उपायांमध्ये केळीचाही समावेश आहे. केळी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चेहऱ्यावर केळीचा कसा वापर करावा हे जाणून घेऊया.

  • केळी आणि मध

केळीमध्ये मध मिक्स करून त्वचेवर लावता येतात. केळीला मधासोबत चेहऱ्यावर लावता येते. केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात, तर मधही अनेक गुणधर्मांनी समृद्ध असतो आणि या दोन्हींचा वापर त्वचेच्या निगा राखण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • अशा प्रकारे करा वापर

सर्वात आधी केळी मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा.

या पेस्टमध्ये मध मिक्स करा आणि लावा.

पेस्ट त्वचेवर लावा.

30 मिनिटांनंतर, पाण्याच्या मदतीने पेस्ट मॅश करून स्वच्छ करा.

यानंतर चेहरा मॉइश्चरायझ करा.

असे आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो.

असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

  • केळी आणि दूध पावडर

केळीसोबत दुधाची पावडरही वापरली जाऊ शकते. केळीसोबत दूध पावडरचा वापर केल्याने त्वचेशी संबंधित समस्या तर कमी होतातच शिवाय त्वचा चमकदार बनते.

  • अशा प्रकारे करा वापर

केळीची पेस्ट बनवा.

या पेस्टमध्ये दूध पावडर घाला.

ही पेस्ट त्वचेवर लावा.

अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा .

असे आठवड्यातून दोनदा केला जाऊ शकतो.

हा उपाय केल्यास त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतात.

  • केळी आणि रवा

केळीसोबत रवा वापरू शकता. केळीसोबत रवा वापरल्याने चेहऱ्यावरची मृत त्वचा कमा होते.

  • कसा करावा वापर

केळीची पेस्ट करावी.

त्यात रवा मिक्स करावा.

नंतर चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावी.

10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा .

असे आठवड्यातून दोनदा करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT