Health Tips sakal
लाइफस्टाइल

Health Tips: व्यायाम करताना त्वचेची काळजी अशी घ्या! अन्यथा तुमच्या चेहऱ्याचं होईल नुकसान

व्यायाम करणं शरीर आणि त्वचा दोघांसाठीही खूप फायदेशीर ठरतं.

Aishwarya Musale

व्यायाम करणं शरीर आणि त्वचा दोघांसाठीही खूप फायदेशीर ठरतं. तुम्हाला माहित आहे का की त्वचेची काळजी घेताना काही चुका तुमची त्वचा देखील खराब करू शकतात. व्यायाम करताना खास करून या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण व्यायाम केल्याने आपल्याला खूप घाम येतो.

तुम्ही जर घाम साफ केला नाही तर तुमच्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही जर रोज जिममध्ये जात असाल तर तुम्ही काही हेल्दी केअर टिप्सचा अवलंब अवश्य करा.

वर्कआउट स्किन केयर टिप्स-

स्किन क्लीन करा

तुम्ही वर्कआउटपूर्वी चेहरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्वचेवर जमा झालेली घाण यामुळे साफ होते. आपला चेहरा व्यायाम करण्यापूर्वी फेस वॉशने स्वच्छ करावा. असे केल्याने आपल्याला त्वचेचा संसर्ग होत नाही.

सनस्क्रीन लावा

तुम्ही जर व्यायाम करत असाल तर सनस्क्रीन नक्की लावा. आपल्या त्वचेला व्यायाम करतानाही संरक्षणाची गरज असते. सनस्क्रीनचा वापर फक्त बाहेर पडतानाच केला जातो असे काही लोकांना असे वाटते, परंतु हे चुकीचे आहे कारण सनस्क्रीनचा वापर केवळ उन्हातच नाही तर सावलीतदेखील केला जातो.

मेकअप लावू नका

व्यायामा दरम्यान काही महिला मेकअप करतात जे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. अशा वेळी तुम्हाला मुरुम आणि इन्फेक्शनची समस्या होऊ शकते. त्यामुळे व्यायामादरम्यान मेकअप करणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT