Heat Stroke Sakal
लाइफस्टाइल

Heat Stroke: उष्माघात कोणाला होऊ शकतो अन् बचावासाठी काय करावे, वाचा सविस्तर

Heat Stroke: उष्माघातापासून कसा बचाव करावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

take these steps to prevent heatstroke during summer

‘‘हीट वेव’ किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सलग तीन दिवस कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात. सलग दोन दिवस तापमान ४५ अंशांवर असल्यास उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ आखण्यात येतो.’’

उष्माघात गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सिअस हे १५ मिनिटांकरिता राहते, तेव्हा शरीरावर गंभीर परिणाम होतात. शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा काम करीत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात.

विविध प्रकारचे लायपो प्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिड्स अस्थिर होतात. शरीरातील मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते. अवयवांचे कार्य ठप्प होऊ लागते. वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास मृत्यूची शक्यता असते.

  • उष्णतेमुळे होणारा त्रास

उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटतात

हातापायाला गोळे व चक्कर येते

तापमान १०६ वर गेल्यास मृत्यूची शक्यता

  • बचाव करण्यासाठी हे करा

पुरेसे पाणी प्यावे. पाणी सोबत ठेवावे.-

हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावे.

उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे.

उन्हात टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवावा.

पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे.

कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत.

ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

  • हे करू नका

शक्यतो उन्हात घराबाहेर जाणे टाळा.

पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.

स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.

मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

  • उष्णतेचा त्रास कुणाला होतो?

उन्हात कष्टाची कामे करणारे.

वृद्ध आणि लहान मुले.

स्थूल लोक, जाड कपडे घालणारे.

पुरेशी झोप न झाल्यास.

गर्भवती महिला.

अनियंत्रित मधुमेह.

हृदयरोग असणारे.

अपस्माराचे रुग्ण.

दारूचे व्यसन असणारे.

काही विशिष्ट औषधे घेणारे.

निराश्रित, बेघर नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : "चंद्रकांत पाटील पालकमंत्री असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती" - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गोरेंवर टोला

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... संजू सॅमसन IN; आयर्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI

‘कोई मिल गया’ वीण दोघांतली…’मधील कलाकारांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

India Squad Change: भारतीय संघात मुंबईकर खेळाडूची एन्ट्री! श्रेयस अय्यरचा भिडू खेळाडू हार्दिक, नितीश कुमारची उणीव भरून काढणार

SCROLL FOR NEXT