fingers
fingers  sakal
लाइफस्टाइल

Hand Fingers: हाताच्या बोटांच्या आकारावरून कळतो व्यक्तिचा स्वभाव अन् नशीब

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली पाहून त्या व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. त्याचप्रमाणे, सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीरावर असलेल्या चिन्हांवरून आणि अवयवांचे विश्लेषण करून व्यक्तीच्या नशिबाबद्दल देखील सांगितलं जातं. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की शरीराच्या अवयवांची रचना व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगण्यास सक्षम आहे.

हे शास्त्र समुद्र ऋषींनी लिहिले होते, म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असेही म्हणतात. याला अनेक लोक अंगशास्त्र या नावाने देखील ओळखतात. तुम्हाला आज आम्ही हाताच्या बोटांवरून माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत.

पातळ बोटं असलेले लोक:

ज्या लोकांची बोटं पातळ असतात त्यांचे आरोग्य चांगले असते, असे सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते. हे लोक खूप सर्जनशील आणि बुद्धिमान देखील असतात. इतरांकडून हे लोक फार अपेक्षा ठेवत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट ते स्वतःच्या बळावर करतात.

नातेसंबंध चांगले कसे हाताळायचे हे या लोकांना माहित असते आणि इतरांच्या सुख-दु:खाचा ते खूप विचार करतात. हे लोक मोकळ्या मनाचे असतात.

जाड बोटं असलेले लोक:

जाड बोटं असलेले लोक काम आणि रिलेशनशिपबाबत खूप सिरीयस असतात. हे लोक कंजूष असतात आणि त्यांना पैसे कसे वाचवायचे हे चांगलेच माहित असते. रागीट स्वभावाचे असतात आणि लहानसहान गोष्टींवर त्यांना खूप लवकर राग येतो. करंगळी आणि अनामिका दोन्ही समान असल्यास या व्यक्ती राजकारणाच्या क्षेत्रात जातात, हे लोक चांगले राजकारणी होऊ शकतात, असे बोलले जाते.

दयाळू आणि प्रामाणिक:

सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या हाताचे जर मधले बोट बाकीच्या बोटांपेक्षा मोठे असेल तर ते लोक खूप प्रामाणिक आणि समर्पित असतात. अतिशय गंभीर स्वभावाचे असतात हे लोक आणि प्रत्येक काम मोठ्या समर्पणाने पूर्ण करतात. या लोकांना इतरांची फारशी पर्वा नसते. हे लोक खूप आनंदी असतात.

लहान बोटं असलेले लोक:

ज्यांचे लहान बोटं आहे अशा लोकांना आळशी स्वभावाचे मानले जाते. या लोकांना लॅविश लाईफ जगायला देखील आवडतं. लहान बोटं असलेल्या लोकांचे छंद खूप महाग असतात आणि ते पैसे खर्च करण्यावर विश्वास ठेवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT