The Platelet Booster esakal
लाइफस्टाइल

The Platelet Booster: डेंग्यूपासून बचावाचा सोप्पा फॉर्म्युला; हे हिरवे पान खा प्लेटलेट्स वाढवा!

पपईचा हा प्रयोग खरंच प्लेटलेट्स वाढवतो का?

Pooja Karande-Kadam

The Platelet Booster : सगळ्यांनाच पाऊस आवडतो. पावसाळ्यात अंगाची लाही होत नाही, पावसात भिजून हात फुटतही नाहीत. सगळी पृथ्वी हिरवा साज लेऊन नटलेली असते. कांदा भजी, गरमा गरम चहा, धबधबे, मक्याची कणसे असं सगळं चांगलं सुरू असताना अचानक एक डास चावतो आणि आपल्या शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी करतो.

डॉक्टरांच्या भाषेत या आजाराल डेंगी किंवा डेंग्यू असं म्हणतात. साचलेल्या दुषित पाण्यात होणा डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराची लागण जास्त होते.

आपण कोरोनासारख्या आजाराला अतिशय गांभीर्याने घेतलं आहे, पण तितकंच गांभीर्य डेंग्यूशी लढताना घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रशासन आपापल्या प्रकारे सर्व उपाययोजना करतं पण या आजाराला रोखणे हे आपल्याच हाती आहे. कारण या आजाराचे डास आपल्यालाच घराजवळ जन्म घेतात आणि आपला जीव धोक्यात आणू शकतात. (The Platelet Booster: Utilizing the Power of a Green Leaf for Immediate Dengue Fever Relief)

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होऊ लागतो, त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका वाढतो. डेंग्यू हा एक प्राणघातक विषाणू आहे जो दरवर्षी शेकडो लोकांचा बळी घेतो. डेंग्यूमुळे शरीरात प्लेटलेट्सची कमतरता असते, ज्याची वेळीच काळजी घेतली नाही तर ही समस्या तुमचा जीव घेऊ शकते.

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी औषधांसोबत अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून प्लेटलेट्सची संख्या वाढवता येते. येथे आम्ही तुम्हाला प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर सांगत आहोत.(Dengue)

डेंग्यू जिवघेणा ठरू शकतो का?

बघायला गेलं तर डेंग्यू हा फक्त तापाचा एक प्रकार आहे. पण हा ताप जर हाताबाहेर गेला तर मात्र रुगांचा मृत्यू निश्चित आहे. कारण या आजारात रूग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स अतिशय वेगाने कमी होऊ लागतात. तुम्हाला माहित असलेच की प्लेटलेट्स शरीरासाठी किती गरजेच्या आहेत.

त्यामुळे जेव्हा या प्लेटलेट्स कमी होऊ लागतात तेव्हा रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमी होते आणि रक्त वाहून जाऊ नये म्हणून रोखणारी क्षमता सुद्धा कमजोर पडते. शेवटी त्या रुग्णाचा मृत्यू होतो. (Monsoon Care)

पपईच्या पानाचे गुणधर्म

अशा परिस्थितीत पपईच्या पानांचा रस वेळेवर प्यायल्यास तुमच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. पपईच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि पॅपेन नावाचे संयुग असते. हे सर्व पोषक तत्व शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतात.(Mosquito)

पपईची पानांचा रस कसा बनवावा?

  1. पपईची पाने घरी आणा आणि फक्त मऊ पाने काढून टाका आणि देठ वेगळे करा.

  2. ही सर्व पाने स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्यावीत.

  3. पानांचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये ठेवा.

  4. तुळशीची काही पाने आणि काळी मिरीही यामध्ये मिसळता येते.

  5. आता हे सर्व मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. त्यामुळे हिरव्या चटणीसारखी पेस्ट तयार होईल.

  6. शेवटी या चटणीची पेस्ट मलमलच्या कापडावर ठेवा आणि त्यातील रस पिळून घ्या.

  7. तुमच्या पपईच्या पानांचा रस तयार आहे. हा रस चवीला कडू असला तरी प्यायल्याने प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.

पपईचा हा प्रयोग खरंच प्लेटलेट्स वाढवतो का?

NCBI च्या रिपोर्टनुसार, पपईच्या पानांचा अर्क प्यायल्याने प्लेटलेट आणि RBC काउंट वाढते. पपईच्या पानांचा रस मानवांमध्ये थ्रोम्बोपोईसिस आणि एरिथ्रोपोईसिसला चालना देण्यासाठी सेवन केला जाऊ शकतो.

डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात.पपईच्या पानांमध्ये जीवनसत्त्व 'क' आणि अँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. तुम्हाला माहित असेलच की जीवनसत्त्व क आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. (Papaya)

अँटीऑक्सीडेंट्स हे विषाणू आणि जंतू नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे डेंग्यूवर पपईची पाने अतिशय रामबाण ठरू शकतात. अनेक तज्ञ आणि जाणकार सुद्धा पपईचा पानांचे हे महत्त्व जाणून असल्याने हा उपाय ट्राय करण्याचा सल्ला आवर्जुन देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

SCROLL FOR NEXT