Jamun Tree Sakal
लाइफस्टाइल

Jamun Tree: गुणकारी अन् औषधीयुक्त जांभळांची झाडे होताहेत नामशेष

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरवातीला जांभूळ बाजारात दाखल होतात. सध्या बाजारात जांभळांची आवक घटली आहे

सकाळ वृत्तसेवा

Jamun Tree: अंजिठा लेणी परिसरातील सध्या जांभूळ फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र, पाऊस वाढेल तसतशी या फळाची आवक जास्त प्रमाणात बाजारात वाढते.

आंबट, गोड असा स्वाद असलेल्या आंबा, चिंच, बोर, जांभूळ अशा रानमेव्याची नुसती नावे ऐकली, तरी तोंडाला पाणी सुटते. निसर्गाने या प्रत्येक फळाला चवीसह औषधी गुणधर्माने समृद्ध केले आहे.

लांबट आणि गोल आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरवातीला जांभूळ बाजारात दाखल होतात. सध्या बाजारात जांभळांची आवक घटली आहे. पण, यावर्षी रसरशीत जांभळांच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जांभूळ खाण्याचे फायदे

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात, अपचनाची समस्या दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

जांभूळ हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन सी असते. जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते; तसेच शरीरातील रक्ताची पातळी वाढते.

शंभर रुपये प्रतिकिलो मिळतोय दर

बहुऔषधी गुणयुक्त, १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करणारे उपयुक्त जांभूळ वृक्ष अलीकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. जून महिना लागताच १०० रुपये किलोप्रमाणे या जांभळांची विक्री होत आहे.

जांभळाची नुसती फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते.

दररोज ४ ते ५ जांभळांचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही, तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते.

या फळापासून वाईन, व्हिनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलीकडे सुरवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभूळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड पाणीरोधक आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्षलागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.

जांभूळ हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे, म्हणून ज्यांना शरीरात व्हिटॅमिन-सी ची कमतरता आहे, त्यांना जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. जांभुळ आम्लीय फळ मानले जाते आणि हे चवीला गोडदेखील असते. यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात आहे. शरीराला आवश्यकता असलेले घटक जांभळामध्ये आढळतात.

- प्रमोद खोडपे, निसर्गप्रेमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

Solapur Fraud: 'सोलापुरातील महिला डॉक्टरची १७ लाखांची ऑनलाइन फसवणूक'; संशयित आरोपी राजस्थान, दिल्लीतील

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

SCROLL FOR NEXT