Planting  Sakal
लाइफस्टाइल

झाडे लावा; पण देशी प्रजातीचीच

वृक्षारोपण करताना आपल्या भागात वाढणारी, सावली देणारी, पक्ष्यांना घरटी बांधता यावीत, अन्नपाणी मिळावे, अशीच म्हणजे भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

पावसाळा सुरू झाला. निसर्गप्रेमी झाडे लावण्यासाठी तयारी करीत आहेत. पाऊस पडल्यानंतर जागोजागी अनेक संस्था, संघटना वृक्षारोपण करतात. मात्र, वृक्षारोपण करताना आपल्या भागात वाढणारी, सावली देणारी, पक्ष्यांना घरटी बांधता यावीत, अन्नपाणी मिळावे, अशीच म्हणजे भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याची गरज आहे. वृक्षारोपण करताना सशक्त रोपे असतील तर ती तग धरतील आणि सीडबॉलद्वारे करण्यात आलेले बीजारोपण झुडपांजवळ केले तर ते वाढेल आणि खऱ्या अर्थाने वृक्षारोपणाचा हेतू साध्य होईल.

दरवर्षी उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही होते. यावेळी कूलर, पंखे लावून तात्पुरता मार्ग आपण काढतो. मात्र, वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी वनराई वाढवणे, शहराचे हरित आच्छादन वाढवण्याची गरज आहे. यासाठी अनेक निसर्गप्रेमी व्यक्ती, संस्था वृक्षारोपण करतात. वृक्षारोपण करून ते वाढवतात. उन्हाळ्यातही जगवतात ही कौतुकास्पद बाब आहे. वृक्षारोपण करताना ती झाडे सावली देणारी असावीत, पक्ष्यांना खाण्यासाठी उपयुक्त फुले, फळे देणारी आणि त्यांना घरटी बांधण्यासाठी योग्य असली पाहिजेत. पर्यावरणाचे संतुलन राखणारी, वाहनातून निघणारा धूर शोषून घेणारी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मदत करणारी झाडे असली पाहिजेत. निसर्गप्रेमी रंजन देसाई म्हणाले, ‘‘वड, पिंपळ, बहावा, उंबर, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, आवळा, चिंच, कडुनिंब, आंबा, पळस, बेल, कापूर अशी झाडे लावली पाहिजेत.’’

सशक्त रोप रुजते

वृक्षारोपण करताना रोप कसे असावे याविषयी वन विभागातील निवृत्त सहायक वनसंरक्षक आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले, ‘‘रोप लावायचे असल्यास ते किमान दोन फुटांहून अधिक उंच असले पाहिजे, त्याची काडी जाड असली पाहिजे. थोडक्यात रोप सुदृढ असावे. सीड बॉलचे बीजारोपण करताना ते कुठेही फेकण्याऐवजी ते झुडपाजवळ टाकावे म्हणजे सीडबॉलमधून रोप तयार झाले तर त्याला त्या झुडपाचे संरक्षण मिळते. पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बिया असतील तर त्यांची उगवण क्षमता अजून चांगली असते.’’

कडुनिंबाच्या झाडाच्या खोडापासून फळापर्यंत सर्व औषधी गुणधर्माने युक्त आहेत. बाभळीच्या झाडापासून बकऱ्यांना चारा मिळतो, बाभळीपासून डिंक मिळतो. बाभळीचा कोळसा अधिक ज्वलनशील असतो. वड आणि पिंपळ तर चोवीस तास १०० टक्के ऑक्सिजन देणारी झाडे आहेत. त्यामुळे ही झाडे आवर्जून लावली पाहिजेत.

— रंजन देसाई, निसर्गप्रेमी

साधारणपणे शहरी भागात रस्त्याने जाताना रणरणत्या उन्हात पादचारी असो दुचाकीवर जाणारे असतो कधी तरी सावलीचा शोध घेतात. त्यावेळी त्यांना सावली मिळाली पाहिजे. यासाठी सावली देणारी झाडे लावावी त्यातही सप्तपर्णी, शिरस, कडुनिंब, आंबा अशी झाडे लावण्याची गरज आहे.

— आर. व्ही. कुलकर्णी, निवृत्त सहायक वनसंरक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

IND vs NZ: अभिषेक शर्माने का पूर्ण केली उपकर्णधार अक्षर पटेलची ओव्हर? पहिल्या T20I असं काय घडलं, जाणून घ्या

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

SCROLL FOR NEXT