diabetes  sakal
लाइफस्टाइल

Diabetes: मधुमेह घरच्या घरी करता येतो नियंत्रित, करा ‘हे‘ 3 घरगुती उपाय

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे.

Aishwarya Musale

मधुमेहाची समस्या जगभरात महामारीसारखी पसरत आहे. गेल्या काही दशकांमध्ये हा आजार झपाट्याने पसरला असून सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर वाईट परिणाम होतो आणि त्यावर नियंत्रण न ठेवल्यास हा आजार शरीराला हळूहळू पोकळ बनवतो.

जर रक्तातील साखर मर्यादेपलीकडे वाढली तर ती घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. काही घरगुती उपायांनीही मधुमेह नियंत्रित करता येतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 प्रभावी उपायांबद्दल सांगत आहोत.

फ्लेक्ससीड - मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिया रामबाण उपाय मानल्या जाऊ शकतात. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, फ्लेक्ससीडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फ्लेक्ससीड कमी ग्लायसेमिक लोड असलेल्या पदार्थांमध्ये समाविष्ट केल्या जातात. त्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

यासोबतच पचनाची समस्याही दूर होते. रोज एक चमचा जवसाच्या बियांचे सेवन केल्यास साखरेची पातळी धोक्यात जाण्यापासून रोखता येते. फ्लेक्ससीड दह्यात मिसळूनही खाऊ शकतात. या बियांचे तेलही साखरेच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते.

कांदा – रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कांद्याचा अर्क रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो.

हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला होता. यामध्ये संशोधकांनी कांदा हे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय असल्याचे सांगितले आहे. कांद्यामध्ये असलेले घटक हाडांचे आरोग्य सुधारतात आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करतात.

कोरफड – एका संशोधनात असे आढळून आले आहे की कोरफडीचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कोरफडीचे सेवन केल्याने ग्लायसेमिक नियंत्रणावर सकारात्मक परिणाम होतो.

कोरफड हे वजन नियंत्रणासाठी देखील फायदेशीर मानले जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तुमची साखरेची पातळी मर्यादेपेक्षा जास्त असली तरी कोरफडीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT